सूत्रांच्या माहितीनुसार या महिन्यातच कुटुंबाची विभागणी होऊ शकते. करारानुसार, नोव्हेंबरमध्ये कुटुंबांमध्ये विभाजन झाले नाही, तर हे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात पोहोचू शकते. या समूहात डझनभर कंपन्या असून त्यापैकी सहा सूचीबद्ध आहेत. यामध्ये इंडसइंड बँकेचाही समावेश आहे. हिंदुजा कुटुंबातील भांडणाचे मूळ २ जुलै २०१४ रोजी झालेला करार आहे, ज्याच्यावर चारही भावांच्या सह्या होत्या. त्यात म्हटले आहे की कुटुंबातील सर्व काही प्रत्येक व्यक्तीचे आहे. श्रीचंद हिंदुजा यांनी त्यांचे भाऊ जीपी हिंदुजा, पीपी हिंदुजा आणि एपी हिंदुजा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा २०१४ च्या कराराच्या वैधतेशी संबंधित आहे.
नोव्हेंबर २०१९ पासून यावरून कायदेशीर वाद सुरू होता. श्रीचंद हिंदुजा यांच्या तीन लहान भावांनी असा युक्तिवाद केला की हे पत्र १०० वर्षांहून अधिक जुने हिंदुजा समूहाची उत्तराधिकार योजना आहे. पण त्याला श्रीचंद हिंदुजा यांच्या मुली शानू आणि वीणू यांनी आव्हान दिले. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर युरोपातील अनेक देशांमध्ये हिंदुजा बंधूमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. यामुळे कुटुंबाचे नुकसान होत आहे.
हिंदुजा समूहाचा व्यवसाय
हिंदुजा समूहाचा व्यवसाय ट्रक उत्पादनापासून बँकिंग, रसायने, उर्जा, मीडिया आणि आरोग्यसेवेपर्यंत पसरलेला आहे. समूह कंपन्यांमध्ये ऑटो प्रमुख अशोक लेलँड आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. १४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. या समूहाच्या कंपन्यांचा व्यवसाय ३८ देशांमध्ये पसरलेला असून १५०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. हिंदुजा ग्रुपची स्थापना ब्रिटिश भारतातील सिंध प्रांतातील श्रीचंद परमानंद यांनी १९१४ मध्ये केली होती. हिंदुजा समूह ही एकेकाळी कमोडिटी ट्रेडिंग फर्म होती, पण श्रीचंद आणि त्यांच्या बंधूंनी त्यांचा व्यवसाय इतर क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढवला.
श्रीचंदच्या मुलींनी स्वित्झर्लंडमधील एसपी हिंदुजा बॅंक प्रिव्ह एसएच्या नियंत्रणासाठी न्यायालयात खटला दाखल केला, तेव्हा हिंदुजा कुटुंबातील मतभेदाची पहिली फूट समोर आली. श्रीचंद यांची मुलगी सानू या बँकेच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मुलगा करम हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांनाही या बँकेवर त्यांचे नियंत्रण हवे होते, त्यानंतर वाद सुरू झाला. या वादामुळे १०० वर्षांहून अधिक जुने कॉर्पोरेट साम्राज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले.
स्विस बँक कोणाला मिळेल
सूत्रांच्या माहितीनुसार हिंदुजा ग्रुपची स्वित्झर्लंडमधील बँक एसपी हिंदुजा ग्रुपकडेच राहू शकते. पण हिंदुजा कुटुंबाने बँक एसपी ग्रुपला देण्याचे मान्य केले आहे की नाही याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. SP हिंदुजा ग्रुपने २०१३ मध्ये Banca Commerciale Lugano विकत घेतले आणि हिंदुजा बँकेत (स्वित्झर्लंड) विलीन केले. नंतर त्याचे नाव बदलण्यात आले. श्रीचंद हिंदुजा त्याचे संस्थापक अध्यक्ष झाले. श्रीचंदची तब्येत ठीक नसून त्याचा फायदा घेऊन त्याच्या मुली त्याच्या इच्छेविरुद्ध काम करत असल्याचा आरोप त्यांच्या भावांनी केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, श्रीचंद हे हिंदुजा डिमेंशिया (Memory विस्मरण) या आजाराने ग्रस्त आहेत.
स्विस बँक हिंदुजा ग्रुपच्या बाकीच्या कंपन्यांपेक्षा खूपच लहान आहे, पण तिकडे लक्षणीय क्रॉस होल्डिंग आहे. अशोक लेलँडमध्ये त्यांची ४.९८ टक्के हिस्सेदारी आहे. सध्याच्या मार्केट कॅपनुसार त्याची किंमत २१९५ कोटी रुपये आहे. याशिवाय एसपी हिंदुजा, मॉरिशसस्थित इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स (IIH) चे अध्यक्ष एमेरिटस आहेत. इंडसइंड बँकेत त्यांची १२.५८टक्के हिस्सेदारी आहे. या बँकेचे मार्केट कॅप (बाजार मूल्य) ८९ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यानुसार, IIH च्या भागभांडवलाचे मूल्य ११,२०५ कोटी रुपये आहे.
याशिवाय, IIH कडे हिंदुजा लेलँड फायनान्स आणि इंडसइंड मीडिया अँड कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्येही भागीदारी आहे. सध्या त्याचे अध्यक्ष अशोक हिंदुजा आहेत. सानू आणि विनू हिंदुजा यांचेही हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स या सूचीबद्ध कंपनीमध्ये शेअर्स आहेत. हा प्रमोटर ग्रुपचा एक भाग आहे. मात्र, क्रॉस होल्डिंगचे निराकरण कसे होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या समझोत्याचा तपशील दोन्ही पक्ष उघड करू इच्छित नाहीत.