मानवी प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा
– हजारो वर्षांपासून १८००पर्यंत जगाची लोकसंख्या एक अब्जाहून कमी होती.
– लोकसंख्येमध्ये एक ते दोन अब्जांपर्यंत वाढ होण्यास १००हून अधिक वर्षे लागली.
– लोकसंख्येच्या घड्याळाने १५ नोव्हेंबरला ८,००,००,००,०००चा आकडा दाखवला.
‘संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी’चे ट्वीट
– आठ अब्ज आशा. आठ अब्ज स्वप्ने. आठ अब्ज शक्यता. आपली पृथ्वी आता आठ अब्ज लोकांचे निवासस्थान आहे.
– आपण एकत्रितपणे आठ अब्ज लोकांची भरभराट करणारे जग निर्माण करू शकतो.
– गरिबी व लैंगिक असमानता दूर करणे, आरोग्यसेवेतील प्रगती आणि शिक्षणाच्या पुरस्कार यांतून झालेली लोकसंख्येतील वाढ ही मानवतेच्या कर्तबगारीचा पुरावा आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार…
– मागील शतकात जगाच्या लोकसंख्येत तुलनेने झपाट्याने वाढ.
– वाढीचा वेग हळूहळू कमी होत असतानाही जागतिक लोकसंख्या २०३७च्या सुमारास नऊ अब्जांपर्यंत.
– २०५८च्या सुमारास ती १० अब्जांचा टप्पा ओलांडू शकते.
– २०८०च्या दशकात जगाची लोकसंख्या १०.४ अब्जांपर्यंत पोहोचेल व २१००पर्यंत जवळपास तेवढीच राहील.
भारताची सर्वाधिक भर
– जगाच्या अखेरच्या एक अब्ज वाढीत भारताचे १७ कोटी ७० लाख लोकसंख्येची भर.
– भारत पहिल्या क्रमांकावर तर, ७.३ कोटी लोकसंख्येसह चीन दुसऱ्या क्रमांकावर
– पुढील वर्षी चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार
– २०२२मध्ये भारताची लोकसंख्या १.४१२ अब्ज, तर चीनची १.४२६ अब्ज
– २०५०मध्ये भारताची लोकसंख्या १.६६८ अब्ज असेल. या शतकाच्या मध्यापर्यंत ती चीनच्या १.३१७ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाण्याचा अंदाज
सर्वाधिक किशोरवयीन भारतात
– २०२२मध्ये भारतातील ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील
– ६५ आणि त्याहून अधिक वयाचे लोक लोकसंख्येच्या सात टक्के
– २७ टक्के लोकसंख्या १५ ते २९ वयोगटातील
– जगातील सर्वाधिक २५ कोटी ३० लाख किशोरवयीन लोकसंख्या (१० ते १९ वर्षे) भारतात
तज्ज्ञ म्हणतात…
– सन २०२३मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकताना भारताने याकडे संधी म्हणून पाहावे
– यामुळे जगासाठी संसाधननिर्माता बनण्याला वाव
– उत्तम नियोजनासह आठ अब्ज लोकांना निरोगी आणि आनंदी जीवन प्रदान करण्याची संधी
– भारताने गर्भनिरोधकांची अपुरी गरज दूर करण्यावर लक्ष केंद्रित करणेही गरजेचे