amravati electricity news today, वीज चोरीसाठी लढवली हायटेक शक्कल, तब्बल १ कोटी १२ लाखांचा गफला पाहून महाविरणही चक्रावलं – hi tech method of electricity theft exposed in amravati electricity theft of 1 crore 12 lakh rupees has come to light
अमरावती : महावितरणने अमरावती शहरात राबविलेल्या धडक मोहिमेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात २६२ वीज ग्राहकाकडून १ कोटी १२ लाख रूपयाच्या वीज चोऱ्या उघड करण्यात आल्या आहेत. वीज चोरीमुळे वीज यंत्रणेवर अतिरिक्त भार निर्माण होऊन सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा निर्माण होतो. तसेच महावितरणला आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शहरातील वीज चोरी मोहिमेला अधिक गती देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी दिली आहे.
वितरणहानी जास्त असलेल्या अमरावती शहरातील विविध भागातील वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्या नेतृत्वात उपविभागानुसार वीज चोरी पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय भरारी पथकाची मदत घेऊन वीज चोरीविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. ऑक्टोबर आणि नाव्हेंबरमध्ये केलेल्या कारवाईत विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत दंडासहीत वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून २६२ वीज चोरी प्रकरणामध्ये १२० प्रकरणात ४८ लाख ८८ हजार रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. Shraddha Murder Case : आफताबची कुंडली, मर्डरचं स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग अन् श्रद्धाचा The End; दिल्ली क्राईममधील संपूर्ण घटनाक्रम
वीज मीटरमध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच अशा ग्राहकांवर वीज चोरी करण्यात आलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते.
प्रति केडब्ल्यूएचपीनुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये प्रती किलो वॅट, वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये प्रती किलो वॅट तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये प्रती किलो वॅट दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येतो. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. भरधाव कारने दुचाकीला लाबंपर्यंत फरफटत नेलं, पुणे-नगर महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO