बुलंदशहर, उत्तर प्रदेश : डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये जमावानं केलेल्या हल्ल्यात () एका पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी याचा एका भाजप नेत्यासोबत व्हायरल झालेला फोटो…

बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयानं जमावानं हिंसाचार घडवून आणला होता. या हिंसेत पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह () यांची हत्या घडवून आणण्यात आली होती. सुबोध कुमार यांच्या हत्येचा रट रचण्याचा आरोप शिखर अग्रवाल याच्यावर करण्यात आला होता. हाच शिखर अग्रवाल सध्या भाजपचे बुलंदशहरचे जिल्हाध्यक्ष () यांच्यासोबत दिसतोय.

शिखर अग्रवाल आणि अनिल सिसोदिया यांचा हा फोटो १४ जुलैचा आहे. संघटनेनं आयोजित केलेल्या ‘पंतप्रधान जन कल्याणकारी योगी जागरुकता मोहिमे’च्या एका कार्यक्रमाचे अनिल सिसदिया मुख्य पाहुणे होते. याच कार्यक्रमातला हा फोटो आहे.

या फोटोत भाजप जिल्हाध्यक्ष शिखर अग्रवाल याला एक प्रमाणपत्र देताना दिसत आहेत. या प्रमाणपत्रात शिखरचा उल्लेख संघटनेचा महासचिव म्हणून करण्यात आलाय. शिखर हा भाजपच्या तरुण संघटनेचा स्थानिक अध्यक्षही होता. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

वाचा :

वाचा :

भाजप नेत्याचं स्पष्टीकरण

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांची गोची झाली. सिसोदिया यांनीही लगेच सारवासारव करत ‘संघटनेचा भाजपशी काहीही देणं-घेणं नाही. मला केवळ मुख्य पाहुणा म्हणून पाचारण करण्यात आलं होतं. याहून अधिक काहीही नाही’ असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

काय घडले होतं डिसेंबर २०१८ मध्ये?

३ डिसेंबर २०१८ मध्ये बुलंदशहरच्या स्याना भागात कथित स्वरुपात गाईचे काही अवशेष सापडले होते त्यानंतर परिसरात हिंसा उफाळली होती. पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु, जमावानं उलट त्यांच्यावरच हल्ला केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची हत्या करण्यात आली. तसंच गोळी लागल्यानं सुमित नावाच्या आणखीन एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.

वाचा :

वाचा :

पोलीस निरीक्षकांच्या हातातून रिव्हॉल्वर हिसकावल्यानंतर त्याच हत्यारानं गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. इतकंच नाही तर कुऱ्हाडीनं त्यांच्या डोक्यावर अतिशय निर्दयीपणे वार करण्यात आले होते. त्यांच्या हातांची बोटंही छाटण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी सुबोध कुमार यांचा मृतदेह सरकारी गाडीत टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्नही केला होता.

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली होती. त्यांनी आपला गुन्हाही कबूल केला. या घटनेतील ३३ पैंकी ७ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली होती. यातील एक शिखर अग्रवाल हादेखील आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर शिखर अग्रवाल याला फुलांची माळ घालून त्याचं स्वागत करण्यात आलं तसंच ‘श्री राम’ची घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरही मोठा वाद झाला होता.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here