पुणे : पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील दर्ग्यावरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवावा अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांच्या या मागणीनंतर आता नवा वाद उभा राहिला आहे. शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजा ( दिल्ली दरवाजा ) जवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागला आहे. शनिवार वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही. हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण ३० वर्षां पूर्वीच टाईल्सचं काम दिसत आहे, असा दावा दवे यांनी केला आहे.

दरम्यान, सदर वाडा हा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येत असल्याने ते असा कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किव्वा देऊ शकतील अशी शक्यता नाही. यामुळे हा दर्गा सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्यला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्यच्या वास्तूचे महत्वसुद्धा कमी होऊ शकते, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

महाराष्ट्रातील Kantara! घनदाट जंगलात गावकरी आजही करतात शीर नसलेल्या नंदीची पूजा; कारण…
आम्ही सदरचं निवेदन पुरातत्व खाते आणि अतिक्रमण खात्याला दिले आहे. तसेच सैयद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाले यांची का नाही ? असा सवाल देखील दवे यांनी केला आहे. दुसरीकडे, १२३३ साली असा कोणी पीर बाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवार वाडा भूमी पूजापासून ते वास्तू आणि इथल्या प्रत्येक घटनेचा इतिहास उपलब्ध आहे. यात कोठेही या दरग्याचा उल्लेख दिसत नाही, असा दावा देखील दवे यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात आता या दर्ग्यावरून एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात २२ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेत मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी झाल्या आहेत, असं वक्तव्य केलं होत. त्यावरून मोठं वादंग निर्माण झालं होत. आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या दाव्यावरून पुण्यातील वातावरण तापण्याचे चिन्ह आहेत.

वीज चोरीसाठी लढवली हायटेक शक्कल, तब्बल १ कोटी १२ लाखांचा गफला पाहून महाविरणही चक्रावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here