तुम्हीही रणबीर-आलियाच्या मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर याबाबत आम्ही तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलियाच्या मुलीचे नाव दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी जोडले जाणार आहे. बॉलीवूड लाईफमधील सूत्रांच्या दिलेल्या बातमीत रणबीर आणि आलियाने ऋषी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून हे दोघेही आपल्या मुलीचे नाव ऋषी कपूर यांच्याशी जोडून ठेवतील.
रणबीर आणि आलियाची ही कल्पना ऐकून नीतू कपूर खूप भावूक झाल्या. आपल्या लाडक्या नातीचे नाव जगासमोर आणण्यासाठी ते उत्सुक आहेत. रणबीर आणि आलियाच्या मुलीच्या जन्मामुळे नीतू कपूर सर्वात जास्त आनंदी आहे. तिने आपल्या नातीला सर्वात गोंडस बाळ देखील सांगितलं आहे.
कपूर कुटुंबाने शॉर्टलिस्ट केलेले नाव
रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आले आहे की, रणबीर-आलियासह संपूर्ण कुटुंबाने छोट्या राजकुमारीसाठी नाव शॉर्टलिस्ट केलं आहे. ते लवकरच त्यांच्या राजकुमारीचे नाव जगासमोर जाहीर करणार आहेत.
सध्याच्या ट्रेंडला अनुसरून रणबीर आणि आलिया आपलं नाव जोडून आपल्या मुलीचं नाव ठेवतील असंही अनेकांना वाटतं, पण तसं नाहीये. रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या मुलीचे नाव ऋषी कपूर यांच्याशी संबंधित असेल. आता रणबीर आणि आलिया त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवतात ते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.