नवी दिल्ली: मूळची पालघरची रहिवासी असलेल्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा २८ वर्षीय प्रियकर आफताब अमीन पुनावालानं निर्घृणपणे हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी ३०० लीटरचा फ्रिज आणला. या फ्रिजमधून रोज रात्री २ वाजता तो एक तुकडा काढायचा आणि जवळच असलेल्या जंगलात फेकून द्यायचा. दक्षिण दिल्लीत असलेल्या महरौलीत श्रद्धा आणि आफताबनं एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. याच फ्लॅटमध्ये ते लिव्ह-इनमध्ये राहत होते.

आफताब आणि श्रद्धाच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी मुंबई सोडली आणि ते दिल्लीला राहायला आले. १८ मे रोजी आफताबनं श्रद्धाची निर्घृण हत्या केली. जवळपास ६ महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली. आफताब अशा प्रकारे श्रद्धाला संपवेल याचा विचारदेखील कोणी केला नव्हता. आफताबनं श्रद्धाची हत्या केली. तिचे तुकडे फ्रीजमध्ये होते. त्याच फ्रीजमध्ये आफताब दूध, शीतपेयांच्या बाटल्या ठेवायचा. आपल्या शेजारी एक खुनी राहतोय, याची पुसटशी कल्पनाही आसपास राहणाऱ्यांना नव्हती. त्यामुळे आफताबबद्दल समजताच साऱ्यांनाच जबर धक्का बसला.
आफताबसोबतची ‘ती’ श्रद्धा आमची श्रद्धा नव्हती! वडील आणि मित्रांच्या दाव्यानं सारेच बुचकळ्यात
आफताब अतिशय हुशार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तो चौकशीत प्रश्नांची उत्तर इंग्रजीत देतो. मात्र त्याला हिंदीही उत्तम बोलता येतं, असं पोलीस म्हणाले. आफताब, श्रद्धा राहत असलेल्या घरात असलेला पाण्याचा पंप रात्री उशिरा सुरू व्हायचा, असं त्यांच्या शेजाऱ्यांपैकी काहींनी सांगितलं. याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी दिली. आफताब रात्री उशिरा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. त्यावेळी होणारा आवाज कोणालाही ऐकू नये, शेजारच्यांना संशय येऊ नये यासाठी पाण्याचा पंप सुरू करायचा. पाण्याच्या पंपाच्या आवाज अधिक असल्यामुळे मृतदेह कापताना होणारा आवाज बाहेर जायचा नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
श्रद्धाचं इन्स्टा ॲक्टिव्ह ठेवलं, क्रेडिट कार्डची बिलं भरली; पण एक चूक आफताबला महागात पडली
पुनावाला फार कोणाशी बोलायचा नाही. संध्याकाळी घरी यायचा आणि बहुतेकदा ऑनलाईन फूड डिलेव्हरीच्या माध्यमातून जेवण मागवायचा, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. श्रद्धाचा गळा आवळून खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आफताब जवळच्या बाजारात गेला. तिथून त्यानं एक ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला. त्यासाठी त्यानं क्रेडिट कार्डनं पैसे दिले. २३ हजार ५०० रुपयांना आफताबनं फ्रीज खरेदी केला. त्यानंतर त्यानं चाकू आणि कचरा टाकण्यासाठी असलेल्या पिशव्या विकत घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here