मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर भलामोठा बॅनर लावण्यात आला आहे. मातोश्रीबाहेरचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी कायमस्वरूपी बॅनरची सोय करण्यात आली आहे. ७० फूट लांब आणि ८ फूट उंचीचा हा सर्वात मोठा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नव्या नावासह बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनरवर ठाकरे कुटुंबातील चार सदस्यांचे चेहरे दिसत आहेत.

शिवसेनेचे वेगवेगळे नेते विविध कारणांस्तव मातोश्रीबाहेर बॅनर लावायचे. यामुळे विद्रुपीकरण होत असल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडून हा बॅनर लावला गेलाय. उद्धव ठाकरे यांनीच तशा प्रकारच्या सूचना देवून बॅनर लावल्याची माहिती आहे.

या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्याबरोबरच उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच शिवसेनेचे नवे नाव आणि नवे मशाल चिन्हही आहे.

Matoshree Shivsena Banner new

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याचा कॉन्फिडन्स पक्षाच्या नेत्यांमध्ये बोलताना दिसतो.

हेही वाचा : आंबेडकर ठाकरेंच्या युतीच्या चर्चा, मुख्यमंत्र्यांची स्मार्ट खेळी, आजच बाळासाहेबांची भेट घेणार

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टानं धक्का दिला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळली आहे. हायकोर्टानं निवडणूक आयोगाला या प्रकरणी तातडीनं अंतिम आदेश घेण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा : २०१९ पूर्वी हे अडगळीत पडलेले होते, मानेंना आपला इंगा बॅलेट बॉक्स मधून दाखवला पाहिजे | सुषमा अंधारे

८ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं होतं. अंधेरी पोटनिवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता निर्णय आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कधी निकाल देणार यांसदर्भात स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here