ईपीएफ सदस्य स्वतःचा डायरेक्ट यूएएन (UAN) तयार करू शकतात. त्यामुळे पेन्शनशी संबंधित काम सोपे होणार आहे. UAN किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक प्रकारचा ओळख क्रमांक आहे, जो भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी दिला जातो. ज्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते आहे, त्यांचा UAN जारी केला जातो.
युएएन हा १२-अंकी युनिक कोड आहे, जो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO द्वारे दिला जातो. ज्याप्रमाणे तुमचा कायमस्वरूपी खाते क्रमांक किंवा पॅन कायमस्वरूपी असतो, त्याचप्रमाणे ईपीएफ खात्यासाठी UAN देखील कायमस्वरूपी असतो. म्हणजेच तुम्ही नोकऱ्या बदलल्या तरी तुमचा UAN कायम सारखाच राहील.
कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी; २०१४ ची सुधारित पेन्शन योजना वैध, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ईपीएफओने माहिती दिली
असा UAN तयार करा
सर्व प्रथम UAN सदस्य पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
एक पृष्ठ उघडेल, ज्याच्या तळाशी ‘ऑनलाइन आधार सत्यापित UAN वाटप’ वर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला वन टाइम पासवर्ड (OTP) तपासा.
OTP प्रविष्ट (एंटर) करा, सिस्टम तुमचा तपशील आधार डेटाबेसमधून गोळा करेपर्यंत प्रतीक्षा करा. काही वेळात सर्व बॉक्स आपोआप भरले जातील.
आता ‘Get UAN’ वर क्लिक करा. यासोबतच तुम्हाला एसएमएसद्वारे UAN मिळेल.
नोकरदारांना मोठा धक्का! निवृत्ती वेतनवाढीच्या प्रस्तावावर मोठे अपडेट, वाचा सविस्तर तपशील
UAN तयार करण्यासाठी कागदपत्रे
- ओळखपत्र: ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र
- पत्ता पुरावा: रेशन कार्ड, भाडे करार, कोणतेही उपयुक्तता बिल
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) कार्ड
UAN कसे सक्रिय करावे
- EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर ‘सदस्य पोर्टल’ वर जा आणि ‘UAN सक्रिय करा’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, कॅप्चा कोडसह तुमचा UAN क्रमांक टाका.
- ‘Get Authority pin’ वर क्लिक करा.
- ईपीएफओमध्ये नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- OTP प्रविष्ट (एंटर) करा आणि ‘Validate OTP आणि UAN सक्रिय करा’ वर क्लिक करा.
- तुमचा UAN सक्रिय होईल आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला जाईल.
- आता तुम्ही तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या ईपीएफ खात्यात लॉग इन करू शकता.