Gadchiroli News : समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या आणि सामाजासाठी मोठं योगदान दिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांची प्रकृती बिघडली असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात मोठं काम केलं आहे. फक्त गडचिरोलीच नव्हे महाराष्ट्रातही त्यांनी समाजकार्य केलं आहे.

 

rani bang
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये दाखल
गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि गडचिरोलीत जिल्ह्यातील चातगाव येथील सर्च-शोधग्रामच्या प्रणेत्या डॉक्टर राणी बंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर राणी बंग यांचा तीन दिवसांपूर्वी वर्धामध्ये कार्यक्रम झाला होता. याकार्यक्रमानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लगलं. यामुळे त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयता दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

राणी बंग या तीन दिवसांपूर्वी वर्ध्यात होत्या. एका कार्यक्रमासाठी त्या वर्ध्याला गेल्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राणी बंग यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना नंतर नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here