तर लार्ज कॅप सेगमेंटमध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्या – अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन, यांचे गेल्या एका वर्षात वर्चस्व पाहायला मिळत आहे. गेल्या एका वर्षात या पाच कंपन्यांनी गुंतवणूकदारांना सुमारे ६६ ते २३० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
अदानी ग्रीनच्या कमाईने हिरवळ
अदानी ग्रीनने गेल्या एका वर्षात १३१४.३५ रुपयांवरून २१८३.८० रुपयांपर्यंत वाढून ६६.१५ टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या ३ वर्षांत २१८२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक रु. ३०५० आहे आणि नीचांक १२३५ रुपये आहे.
अदानी पॉवरची ताकद
या वर्षी सर्वाधिक परतावा देणार्या टॉप-१० लार्ज कॅप समभागांबद्दल बोलायचे झाले तर त्यात अदानी समूहाच्या चार कंपन्यांचा समावेश आहे. यातील टॉप-३ अदानी समूहाच्या आहेत. एका वर्षात सर्वाधिक परतावा देण्याच्या बाबतीत अदानी पॉवर अव्वल राहिली आहे. तो एका वर्षात १०६.७५ रुपयांवरून २३० टक्क्यांनी वाढून ३५२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षात ४७९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक रु.४३२.५० आहे आणि नीचांक रु. २३ आहे.
अदानी एंटरप्रायझेसने भरगोस परतावा दिला
त्यानंतर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देण्यात अदानी एंटरप्रायझेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अदानी समूहाच्या या समभागाने एका वर्षात १३८ टक्के परतावा दिला असून तो एका वर्षात १७११.६० रुपयांवरून ४०७३.८५ रुपयांवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्रायझेसने तीन वर्षांत १९११ टक्के उसळी घेतली आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४०९६ रुपये आहे आणि १५२८.८० रुपये त्याचा नीचांक आहे.
अदानी गॅस
त्यांनतर अदानी गॅसचा तिसरा क्रमांक लागतो. या समभागाने गेल्या एका वर्षात १३२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी अदानी टोटल गॅसच्या एका शेअरची किंमत १६४८.७५ रुपये होती, जी आता १३२ टक्क्यांनी वाढून ३८३८.४५ रुपये झाली आहे. गेल्या तीन वर्षांत या समभागाने २५२७ टक्के परतावा दिला आहे. ३९१२.४० ही शेअरची ५२ आठवड्यांची सर्वोच्च कामगिरी आहेत तर रु. १५१०.३० त्याचा नीचांक आहे.
अदानी ट्रान्समिशननेही निराश नाही केले
सफालर इंडिया, वरुण बेव्हरेजेस, एचएएल आणि सीजी पॉवरनंतर अदानी ट्रान्समिशन टॉप-१० यादीत आठव्या क्रमांकावर आहे. अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात ७५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षात १११९% पेक्षा जास्त परतावा देणार्या या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा नीचांक रु. १६५०.२५ आणि उच्चांक रु. ४२३६.७५ आहे.