मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही याला दुजोरा दिलाय. ‘भारतीय ट्रायबल पक्षाच्या दोन्ही आमदारांनी प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपलं मागणीपत्रावर चर्चा करून सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केलीय’ असं ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलंय.
वाचा :
वाचा :
वाचा :
याअगोदर भारतीय ट्रायबल पक्षानं काँग्रेसच्या सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत या दोन्ही गटांतील लढाईत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, शनिवारी काँग्रेससोबत झालेल्या बैठकीनंतर बीटीपीच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केलाय.
‘आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मान्य करण्यासाठी आता सरकारनं होकार दर्शवलाय. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या समर्थनासाठी तयार आहोत. बहुमत चाचणी झालीच तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ’ असं या बैठकीनंतर बीटीपीनं म्हटलंय.
जनतेनं निवडलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचंही यावेळी बीटीपीनं म्हटलंय. बीटीपीचे दोन आमदार रामप्रसाद आणि राजकुमार रौत यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी बीटीपीकडून पक्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या व्हिपमध्ये कोणत्याही पक्षाचं किंवा गटाचं समर्थन न करण्याचा आदेश आमदाराना देण्यात आला होता.
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times