नवी दिल्ली: मूळची पालघरची रहिवासी असलेल्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा २८ वर्षीय प्रियकर आफताब अमीन पुनावालानं निर्घृणपणे हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी ३०० लीटरचा फ्रिज आणला. या फ्रिजमधून रोज रात्री २ वाजता तो एक तुकडा काढायचा आणि जवळच असलेल्या जंगलात फेकून द्यायचा. दक्षिण दिल्लीत असलेल्या महरौलीत श्रद्धा आणि आफताबनं एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. याच फ्लॅटमध्ये ते लिव्ह-इनमध्ये राहत होते.

आफताब पुनावालानं सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. २२ मेपासून श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचं आफताबनं पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी श्रद्धाच्या खात्यातील व्यवहार, तिच्या मोबाईलचं लोकेशन, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून होत असलेलं चॅट यांच्या आधारे आफताबची उलट तपासणी केली. श्रद्धा आणि तू २२ तारखेपासून सोबत नव्हतात. मग २२ तारखेनंतरही तिच्या फोनचं लोकेशन महरौली कसं काय होतं? तिच्या बँक खात्यातून तुझ्या बँक खात्यात पैसे कसे काय आले? असे प्रश्न पोलिसांनी आफताबला विचारले. या प्रश्नांमुळे आफताब चपापला. त्यानंतर त्यानं खुनाची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
खोटं बोलून, विल्हेवाट लावून उत्तम बनाव रचला; पण पोलिसांच्या एका प्रश्नानं आफताब गडबडला
१८ मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. श्रद्धाला संपवायचं हे मी आधीच ठरवलं होतं. आठवड्याभरापूर्वीच तसा विचार माझ्या डोक्यात आला. १८ मेच्या आधी, आठवड्याभरापूर्वी श्रद्धा आणि माझं भांडण झालं. मी तिला मारणारच होतो. मात्र त्यावेळी ती भावुक झाली, रडू लागली. त्यामुळे तेव्हा तिला मारण्याची योजना रद्द केली, असं आफताबनं पोलिसांना सांगितलं.

श्रद्धाला माझ्यावर विश्वास नव्हता. ती अनेकदा संतापायची. त्यामुळे वाद व्हायचे. मी फोनवर बोलायचो. त्यावेळी ती माझ्यावर संशय घ्यायची. मी या नात्यात किती गंभीर आहे याबद्दल तिला साशंकता होती. तिला खूप राग यायचा, अशी माहिती आफताबनं पोलिसांना दिली. १८ मे रोजी दोघांमध्ये वाद झाला. याच वादानंतर आफताबनं श्रद्धाला संपवलं.
अचानक पाण्याचा पंप सुरू व्हायचा; आफताबच्या शेजाऱ्यांनी सांगितलं काय घडलं ‘त्या’ रात्री
श्रद्धाचा मृतदेह कुठेतरी नेऊन टाकला, तर मी पकडला जाईन अशी भीती मला वाटत होती. त्यामुळे संपूर्ण रात्र मी गुगलवर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचे मार्ग शोधत होतो. माझ्याबद्दल कोणालाही संशय येऊ नये असा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारच्या चॉपरनं मृतदेह व्यवस्थित कापला जाईल, याचा शोध मी गुगलवर घेतला, अशी कबुली आफताबनं दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here