नवी दिल्ली : भारतात निर्मिती करण्यात आलेल्या खोकल्यावरील औषधामुळे आफ्रिकेतील गांबिया येथे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यावर इंफोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी मोठे विधान केले आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या खोकल्याच्या औषधामुळे ६६ मुलांचे मृत्यू होणे ही भारतासाठी अतिशय शरमेची गोष्ट आहे. यामुळे भारतीय कंपन्यांची प्रतिमा डागाळली असल्याचेही ते म्हणाले. (narayan murthy of infosys)

भारतासाठी शरमेची बाब

सोमवारी इंफोसिसच्या प्राइज २०२२ समारंभात संबोधित करत असताना नारायणमूर्ती यांनी खोकल्याचे औषध घेऊन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चिंता व्यक्त केली. त्यावेळी या घटनेमुळे भारताला जगासमोर लज्जेने मान खाली घालावी लागली आहे, असे ते म्हणाले. गेल्या २० वर्षांमध्ये भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा विकास केला आहे, मात्र आजही आमच्या पुढे अनेक आव्हाने आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

हृदयद्रावक! त्यांनी रात्रीचे जेवण घेतले, शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले, पाठीमागे लक्ष नव्हतं आणि…
शिक्षणाच्या गुणवत्तेवरही उपस्थित केले प्रश्न

यावेळी नारायणमूर्ती यांनी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, भारतातील एकही शिक्षणसंस्था वर्ल्ड ग्लोबल रँकिंग २०२२ मध्ये समाविष्ट झालेली नाही. इतकेच नाही तर आम्हाला लस निर्मितीसाठी देखील इतर विकसित देशातील तंत्रज्ञानावर किंवा मग संशोधनावर अवलंबून राहावे लागत आहे. आम्हाला अद्याप डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांवर देखील लस शोधता आलेली नाही. या आजारांशी आपण गेले ७० वर्षे लढा देत आहोत.
ऐकावं ते नवलच! तिहार तुरुंगातील कैद्याने गिळले ५ मोबाईल, अवस्था बिकट, पोटात अजूनही आहेत काही मोबाईल
सफलतेचे दोन मूलमंत्र

नारायणमूर्ती पुढे म्हणाले की, कोणत्याही शोधासाठी किंवा संशोधनातील यशासाठी पहिली गरज पैसा ही नाही. असे जर असते तर पूर्व युरोपातील देश गणिताच्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. संशोधनातील यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षण जगभरातील वर्तमान समस्यांशी संबंधित असावे. दुसरे म्हणजे आमच्या संशोधकांनी वर्तमान समस्यांवर उपाय लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही दुसरी गोष्ट आहे. या आधारे ते भविष्यातील मोठ्या समस्यांवर उपाय शोधू शकतील.
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनंतर हा आहे काँग्रेसचा सर्वात लोकप्रिय नेता, जयराम रमेश यांनी केला मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here