Govar viral infection in Mumbai | गोवंडीतील रफिक नगर, बाबा नगर या भागांमधील हवेत विषारी वायू आहेत. त्यामुळेच सध्या या भागातील बालकांना वेगाने गोवरची लागण होत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने यासंदर्भात एक अहवालही मध्यंतरी प्रकाशित केला होता. यामध्ये गोवंडी परिसरातील मृत्यूदर ९.८ टक्के असल्याचे म्हटले होते. तसेच या परिसरातील नागरिकांचे सरासरी आयुष्य ३८ वर्षे इतके असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.

 

Mumbai Govar
मुंबईत गोवरची साथ

हायलाइट्स:

  • मुंबईतील बालकांना गोवरचा धोका
  • गोवंडीतील नागरिकांना कायम साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत गोवरची साथ अत्यंत वेगाने फैलावत असल्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतील आठ विभागांतील झोपडपट्ट्यांमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामध्ये गोवंडी परिसर हा गोवरचा हॉटस्पॉट झाला आहे. गोवंडी परिसरात हा मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागात येतो. या भागात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १०९ जणांना गोवरची लागण झाली आहे. यापैकी ८४ रुग्णांची नोंद ही सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात झाली आहे. त्यामुळे सध्या गोवंडी परिसर गोवरच्या साथीचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. यासाठी गोवंडी परिसरात असलेले देवनार डम्पिंग ग्राऊंड मुख्य कारण ठरत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी आरोग्य मंत्रालयाला कायदेशीर नोटीसही धाडली आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येणाऱ्या जैविक वैद्यकीय कचऱ्यामुळे या परिसरात साथीच्या आजारांचा वेगाने फैलाव होतो. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करावी. याठिकाणी जैविक वैद्यकीय कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका फैय्याज शेख या स्थानिक नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी असून या ठिकाणी दाटीवाटीने घरे आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागून असणाऱ्या जैविक वैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पामधून विषारी वायू तयार होतो. हा वायू आजुबाजूच्या परिसरात पसरत असल्याने येथील स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. यामुळे गोवंडीतील नागरिकांना कायम साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. सध्या याठिकाणी वेगाने पसरत असलेली गोवरची साथ, हादेखील जैविक कचऱ्याचाच दुष्परिणाम आहे, असे फैय्याज शेख यांची याचिकेत म्हटले आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या! ​गोवर संशयित रुग्णांचा आकडा ६१७; चिंतेत भर
गोवंडीतील रफिक नगर, बाबा नगर या भागांमधील हवेत विषारी वायू आहेत. त्यामुळेच सध्या या भागातील बालकांना वेगाने गोवरची लागण होत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने यासंदर्भात एक अहवालही मध्यंतरी प्रकाशित केला होता. यामध्ये गोवंडी परिसरातील मृत्यूदर ९.८ टक्के असल्याचे म्हटले होते. तसेच या परिसरातील नागरिकांचे सरासरी आयुष्य ३८ वर्षे इतके असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. या सगळ्यासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील जैविक वैद्यकीय कचरा कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका यासंदर्भात काही पावले उचलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईत गोवरचा धोका वाढला

मुंबईत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, २६ ऑक्टोबरपासून शहरात १४२ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत सात बालकांचा संशयित मृत्यू झाला आहे. मुंबईतील आठ विभागांतील झोपडपट्ट्यांमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यातील सर्वाधिक ५० रुग्ण गोवंडीमध्ये आहेत. त्याखालोखाल कुर्ला विभागात ३१ रुग्ण आढळले आहेत. तसेच २६ ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत मुंबईमध्ये सात बालकांचा गोवरने मृत्यू झाल्याचा संशय आहे. हे संशयित मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात चार, राजावाडी रुग्णालयात दोन आणि एका बालकाचा घरी मृत्यू झाला आहे. पालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, लक्षणे आढळणाऱ्या मुलांना ‘व्हिटॅमिन ए’चे दोन डोस देण्यात आले आहेत. तसेच ज्या मुलांमध्ये लक्षणांची तीव्रता अधिक आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here