Authored by अविनाश महाजन | Edited by सुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Nov 2022, 7:35 pm

Police seized 1000 kg of marijuana : अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारडी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांना एका ट्रकवर संशय आला. त्यांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता ट्रकमध्ये पोत्यात १५०० किलो गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त करून दोघांना अटक केली. स्थानिक पोलिसांनी बिड पोलिसांशी संपर्क साधून तेथेही दोघांना अटक केली.

 

nagpur police seized more than 1000 kg of weed
ओडिशातून बीडला जाणारा संशयास्पद ट्रक अडवला
नागपूर : गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पारडी परिसरात सापळा रचून एक कोटीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ओडिशाहून बिडला एक कोटीचा गांजा जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेला कारवाईचे निर्देश दिले. (nagpur police seized more than 1000 kg of marijuana)

अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारडी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांना एका ट्रकवर संशय आला. त्यांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता ट्रकमध्ये पोत्यात १५०० किलो गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त करून दोघांना अटक केली. स्थानिक पोलिसांनी बिड पोलिसांशी संपर्क साधून तेथेही दोघांना अटक केली. बीडमधून हा गांजा कोणाला देण्यात येणार होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here