गुजरात निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, सोनिया दुहान यांच्यासह ३१ जणांची यादी जाहीर करण्यात आली

गुजरात निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, सोनिया दुहान यांच्यासह ३१ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र २०१९ मध्ये आपल्या भाषणाने ज्यांनी स्वतःची नव्याने ओळख निर्माण केली, जनतेच्या मनावर राज्य केले, राष्ट्रवादीला नवा चेहरा दिला, त्या डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव मात्र या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते खरंच नाराज असल्याच्या चर्चांना आता दुजोरा मिळू लागला आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन पार पडले होते, तेव्हा डॉ. अमोल कोल्हे हे गैरहजर होते. आजारी असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. त्यामुळे कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. शिवाय याबाबत अमोल कोल्हे यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
हेही वाचा : नगरपालिका निवडणुकीमुळं उदयनराजेंची मिठी मारायची नौटंकी सुरु होईल,शिवेंद्रराजे भोसलेंची जहरी टीका
त्यातच आज राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे यांना वगळल्याने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. लवकरच राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली होणार का, अशी कुजबूज सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
पाहा संपूर्ण यादी

हेही वाचा : शिंदे गटाला पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला, पालघरमध्ये ठाकरे गटाचा सुपडा साफ