नगर: व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक नियमावली करण्यात येऊ लागली आहे. नगर जिल्ह्यामध्ये तालुक्यात तर बाहेरगावातून लग्नाला येणाऱ्या मंडळींनी थेट संस्थात्मक कक्षातच थांबावे लागणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत. ( in Ahmednagar )

वाचा:

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. याकाळात लग्नासाठी नियमावली निश्चित केली असली, तरी तिचे पालन होत नसल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या मंडळीमुळे तसेच एखाद्या लग्नाला गेल्यामुळे देखील करोना झाल्याचे समोर येऊ लागले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात तर लग्नासाठी कडक नियमावलीच करण्यात आली आहे. तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तसे आदेशही काढले आहेत.

वाचा:

राज्य सरकारने लग्नाला उपस्थित राहण्यास ५० व्यक्तींसाठी परवानगी दिलेली आहे. परंतु अनेक लग्नसोहळ्यात ५० व्यक्तीच्या उपस्थितीचे बंधन पाळले जात नसल्याचे अनेक प्रकरणात निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे करोना या व्हायरसचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी येथून पुढे लग्न सोहळ्यासाठी आवश्यक ती परवानगी स्थानिक करोना ग्राम दक्षता समितीकडून घ्यावी लागणार आहे. ज्याच्या घरी लग्न आहे, त्यांनी लग्न सोहळ्याचा संपूर्ण तपशीलासह अर्ज ग्राम सुरक्षा समितीकडे द्यावा. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला उपस्थित राहणार नाहीत, या बाबतचे लेखी हमीपत्र द्यावे. हमीपत्रासोबतच लग्नाला उपस्थित राहणाऱ्या ५० व्यक्तींची यादी देण्यात यावी. अर्जामध्ये लग्नाची तारीख, वेळ, ठिकाण स्पष्टपणे द्यावे. लग्नासाठी बाहेरगावाकडून येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइन कक्षात थांबावे लागेल. लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण तपशीलासह नोंद, नोंदवहीला घेण्यात यावी. प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात यावे. लग्नाचे व्हिडिओ चित्रिकरण करून त्याची एक कॉपी ग्रामदक्षता समितीला द्यावी. हे व्हिडिओ चित्रिकरण पाहून त्यामध्ये जर लग्नाला ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

नगरपालिका हद्दीत लग्न असल्यास लग्नाचे व्हिडिओ चित्रिकरण करून त्याची एक कॉपी नगरपालिकेला द्यावी लागणार आहे. लग्नाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने साबण व पाण्याने हात धुवावे, प्रत्येकाने नाक व तोंडावर पुर्णवेळ मास्क लावावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here