अहमदनगर : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकावरून मंगळवारी रात्री वाद झाला. या नाटकात चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आक्षेप घेत सावरकरप्रेमींनी घोषणाबाजी करून शेवटी नाटकात अडथळा आणली होता. आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालणाऱ्यांचा निषेध केला आहे. नथुराम गोडसेच जाहीर समर्थन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काळे यांनी केली आहे. (mi pan nathuram godsech boltoy)

काळे यांनी सांगितले की, अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच जाहीर समर्थन केले. ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केलं असत’ अस निंदनीय वक्तव्य केल आहे. हा देशद्रोह आहे. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे जाहीर उदात्तीकरण स्वतंत्र भारतात काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही. नाटकाला काँग्रेस संरक्षण देण्याचे काम करेल. प्रयोग बंद पाडणाऱ्यांवर आणि गोडसेच्या विकृतीचे समर्थन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक करावी, अशी आमची मागणी आहे.

जगातील सर्वात लांब नाक असलेली व्यक्ती, ३०० वर्षांनंतरही कोणीही मोडू शकले नाही विक्रम, लांबी पाहून लोक झाले थक्क
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना यासंबंधी निवेदन देण्यात येत आहे. काळे म्हणाले, मंगळवारी रात्री उशिरा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटकांनी गोंधळ घालत प्रयोग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कलाकारांवर हल्ला करण्याचा देखील हेतू समाजकंटकांचा होता काय? हे तपासण्याची गरज आहे. या प्रकारामुळे कलाकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकंटकांच्या या गटाचे नेतृत्व करणाऱ्या युवकाने ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केले असते’ असे म्हटले आहे. तसा व्हिडिओ समोर आला आहे. म्हणजे यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे? यामागे कोणते विकृत समूह अथवा लोक आहेत? याचा कसून तपास पोलिसांनी करावा. राज्य नाट्य स्पर्धा ही शासनाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सादर केलेल्या या नाटकाच्या स्क्रिप्टला सेन्सॉर बोर्डाची कायदेशीर पूर्व परवानगी आहे. आक्षेप असणाऱ्यांनी त्यांचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाकडे अथवा योग्य त्या व्यासपीठावर नोंदवावा.यातून या देशामध्ये सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा कुटील डाव हा काही जातीयवादी शक्तींच्या आशीर्वादाने देशात सुरू असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

ना मनुष्य, ना बकरी… अजगराच्या पोटातून जे काही बाहेर आले त्यावर विश्वासच बसणार नाही
काळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील दिले आहे. मात्र या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवू नये. समाजामध्ये, धर्माधर्मात वाद लावू नये. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी यांच्या देखील या देशामध्ये दुर्दैवाने काही माथेफिरुंनी हत्या केल्या. नथुराम गोडसेचे अनुकरण करू इच्छिणाऱ्या माथेफिरुंनी भविष्यात काही अप्रिय घटना घडवल्या तर त्यास संपूर्णत: पोलीस जबाबदार असतील असा इशारा काँग्रेसने दिला आहे. घटनेच्या चौकटीत राहून सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या कलाकारांना आणि विचारांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. पोलीस ती पार पाडणार नसतील तर शहर जिल्हा काँग्रेस ती पार पाडेल,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष दिगंबर रोकडे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.

बेवफा चायवाला…नावच पुरे, धोक्यानंतर उघडले हे दुकान; ब्रेकअप झालेल्या प्रेमींसाठीही ऑफर
काँग्रेसचे या नाटकाला समर्थ का?

या नाटकाला काँग्रेसचा पाठिंबा काय आहे, याबद्दल काळे यांनी सांगितले की, गोडसेच्या समर्थकांकडून गांधीजींबद्दल पसरवण्यात आलेले गैरसमज या नाटकामध्ये खोडून काढण्यात आले आहेत. प्रदीप दळवी लिखित शरद पोंक्षे अभिनीत “मी नथुराम गोडसे बोलतोय” या पूर्वी आलेल्या नाटकातील खोटे दावे उल्हास नलावडे यांच्या नाटकाने खोडून काढले आहेत. मनुवादी अजेंडा चालवणाऱ्यांना अटकाव करण्याच काम हे नाटक करीत आहे. व्हाट्सअप यूनिवर्सिटी मध्ये इतिहासाच अनेक वर्षांपासून नथुरांमचं समर्थन सुरू असणार विकृतीकरण देखील या नाटकाने खोडून काढले आहे, त्यामुळे या नाटकाला आम्ही पाठिंबा देत आहोत, असे काळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here