मुंबई : गोवर संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, मुंबईमध्ये आत्तापर्यंत १६४ बालकांना या आजाराचे निदान झाले आहे. ताप तसेच पुरळ असलेल्या रुग्णांची संख्या १०७९ असून, २०२० व २०२१च्या तुलनेमध्ये ही संख्या अधिक आहे. महापालिकेकडून कस्तुरबा तसेच राजावाडी रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेकडून कस्तुरबा रुग्णालयामध्ये ४८ खाटांचा आणखी एक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर आणि आयसीयू खाटांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.

गोवरचा उद्रेक असलेल्या प्रभागांमध्ये एम पूर्व, ई, एफ उत्तर, जी दक्षिण, एल, एम पश्चिम, पी उत्तर, एच पूर्व या प्रभागांचा समावेश आहे. एकूण २४ प्रभागांमध्ये सर्वेक्षणासह इतर आरोग्यनियोजनासाठी ४७० आरोग्य स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एम पूर्व प्रभागात मोबाइल व्हॅन क्षेत्रीय भेटीसाठी तसेच वस्ती पातळीवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लसीकरणाचा प्रतिसाद वाढावा यासाठी मायकिंगद्वारे गोवर लसीकरण व अतिरिक्त लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. धर्मगुरू व खासगी डॉक्टरांना नियमित लसीकरणाचे फायदे, ताप व पुरळ असलेल्या रुग्णांना जीवनसत्व अ घेण्याचे महत्त्व सांगण्यात येत आहे.

गावठाणाची झोपडपट्टी? देवनारप्रकरणी ‘एसआरए’चा डाव असल्याचा ‘वॉचडॉग फाउंडेशन’चा दावा
कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्याच्या घडीला तीन वॉर्ड असून, ८३ खाटा, १० आयसीयू आणि पाच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कस्तुरबामध्ये ६१ रुग्णांवर उपचार सुरू असून, पाच जण ऑक्सिजनवर तर एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये गरज भासल्यास ४८ खाटांचा आणखी एक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयसीयूच्या १० खाटां २०पर्यंत वाढवण्याची तसेच सध्या असलेले पाच व्हेंटिलेटर १७पर्यंत वाढवण्याची तयारी आहे. गंभीर रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here