हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे. हे शक्य नाही. बाजीप्रभुंची शिवाजी महाराजांप्रती किती मोठी निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंविषयी किती आदर होता हे इतिहासात आहे, सर्वांना माहिती आहे. जेधे-बांदल हे प्रामाणिक देशमुख होते. त्यांच्यात वाद दाखवण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली, असा आक्षेप जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला आहे.

 

Jitendra Awhad Question MNS Raj thackeray Over har har Mahadev Controversy
जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरे

हायलाइट्स:

  • हर हर महादेव चित्रपटाच्या वादाचं प्रकरण
  • बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाच विरोध
  • आता राज ठाकरेंची भूमिका काय? आव्हाडांचा सवाल
मुंबई : ‘हर हर महादेव’च्या रुपात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चरित्रपट आला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटून गेलाय पण चित्रपटाभोवतीचा वाद काही शमायला तयार नाहीये. या चित्रपटाला विरोध करणाऱ्या आणि चित्रपटाचा शो बंद पाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला. अगदी त्यांना अटकही केली गेली. अशी सगळी पार्श्वभूमी असताना आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच चित्रपटाला विरोध केल्याने याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. यावरुनच आता जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांना तसेच चित्रपटाला आवाज दिलाय त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खडा सवाल विचारलाय.

हर हर महादेव या चित्रपट कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही, असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का? तसेच ज्यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे ते आता हा चित्रपट दाखवू नका, अशी मागणी करतील का? आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना विचारलाय.

छत्रपतींच्या इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा दिग्दर्शक निर्मात्यांना इशारा
जितेंद्र आव्हाड यांचे चित्रपटावर आक्षेप काय??

हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे. हे शक्य नाही. बाजीप्रभुंची शिवाजी महाराजांप्रती किती मोठी निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंविषयी किती आदर होता हे इतिहासात आहे, सर्वांना माहिती आहे. जेधे-बांदल हे प्रामाणिक देशमुख होते. त्यांच्यात वाद दाखवण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली. तसेच शिरवळला बायकांचा बाजार भरत असत. हा बाजार कुठे भरवला जात होता, मराठा समाजाचे लोक कधी बाजार भरवत होते हे दाखवलेलं नाही, असं सांगतानाच शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या बखरी आणि नोंदींच्या उलटी बाजू सिनेमात दाखवण्यात आल्याचं आव्हाड म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here