पुणे : तंबाखूला पैसे न दिल्याने मुलाने आईच्या डोक्यात खोरे घालून हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार काल जुन्नर येथे उघडकीस आला होता. मात्र, आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला असून महिलेची हत्या मुलाने नाही तर त्या महिलेच्या पतीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पोलिसांनी खोलपर्यंत जाऊन तपास केल्यानंतर या घटनेत पतीनेच आपल्या पत्नीला संपवल्याचं समोर आलं आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर मुलाची निर्दोष सुटका झाली आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे ही घटना घडली होती.

हत्या केलेल्या बायकोचे नाव अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०, राहणार शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) आहे. तर बारकू सखाराम खिल्लारी (वय ६६) असे आरोपीचे नाव असून नारायणगाव पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

नारायण राणेंकडूनच अनधिकृत बांधकामावर हातोडा; ‘अधीश’ बंगल्यातील पाडकामास सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी अंजनाबाई आणि त्यांना दोन गतिमंद मुले आहेत. पती बारकू खिल्लारी, पत्नी अंजनाबाई व दोन गतिमंद मुले यांच्या समवेत शिरोली तर्फे आळे येथे वास्तव्यास आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शेतीची विक्री करण्याचा निर्णय बारकु याने घेतला होता. मात्र, त्यांच्या पत्नीने शेती विकू नका, असे म्हणत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. या गोष्टीवरून दोघांमध्ये मंगळवारी कडाक्याचे भांडण झाले. या रागाच्या भरात बारकूने घरात असलेले फावडे पत्नीच्या डोक्यात घातले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही सर्व घटना त्यांच्या घरातील गतिमंद मुलांनी पाहिली.

त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मुलाने हत्या केल्याची फिर्याद नारायणगाव पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा अमोल याला अटक देखील केली. पोलिसांना या घटनेत संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांना बारकू याचे रक्ताने माखलेले कपडे सापडले. त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी बारकू याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर त्यानेच हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने पोलीसही काही काळ चक्रावले होते. मात्र, त्यांच्या एका संशयाने संपूर्ण घटनेला पूर्णपणे कलाटणी मिळाली.

INDvsNZ टी-२०, वनडे मालिका टीव्हीवर दाखवली जाणार नाही? ६ मॅच कुठे मोफत पाहता येतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here