Pune News : पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणाधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण आहे की, तीन ते चार फ्लॅटमध्ये ही आग पसरली आहे. दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

Pune Kothrud Fire
Pune News : पुण्यात रहिवासी इमारतीला आग, नागरिकांची सुखरुप सुटका; थरारक Video
पुणे : पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणाधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण आहे की, तीन ते चार फ्लॅटमध्ये ही आग पसरली आहे. दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोसायटीमधील फ्लॅटमध्ये अडकलेल्या आठ नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सोसायटीमधून धुराचे लोट येताना दिसत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाकडून ५ फायरगाड्या आणि १ पाण्याचा टँकर रवाना करण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


कच्च्या तेलावर सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांचा नफा कमी होणार, जाणून घ्या सर्वसामान्यांना काय फायदा?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here