Maharashtra Politics | राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाच्या मेळाव्यात उपस्थिती लावली. यावेळी सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना असली वीर संबोधलं तर सावरकरांना माफीवीर संबोधलं. राहुल गांधी यांच्या याच भाषणावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होतीये.

 

Rahul Gandhi Vs Ranjeet Savarkar
राहुल गांधी यांचं सावरकरांविषयी आक्रमक वक्तव्य

हायलाइट्स:

  • रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर बडगा उगारण्याचा इशारा
  • भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाची बदनामी करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही
मुंबई: राहुल गांधी हे नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीबाही बोलतात. सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील,असा त्यांचा समज आहे. मात्र, या सगळ्या नादात राहुल गांधी (Rahul Gandhi) हे एका देशभक्ताची वाईट आरोप लावून बदनामी करत आहेत. हा प्रकार जनता सहन करणार नाही. राज्य सरकारने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) रोखून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Ranjeet Savarkar slams Rahul Gandhi)

यावेळी रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर बडगा उगारण्याचा इशारा दिला. मी २०१७ मध्ये भोईवाडा कोर्टात राहुल गांधी यांच्याविरोधात केस केली होती. पोलिसांकडून त्याचा तपास सुरु होता. आज मी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाची बदनामी करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही. राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी आग्रही मागणी रणजित सावरकर यांनी केली.
Devendra Fadnavis: काँग्रेसच्या एकातरी स्वातंत्र्यसैनिकाने सावरकरांसारखे अत्याचार सहन केलेत का? फडणवीसांचा सवाल

राहुल गांधी सावरकरांविषयी नेमकं काय बोलले?

भगवान बिरसा मुंडांचं आयुष्य इंग्रजांशी लढण्यात गेलं. वयाच्या २५ व्या वर्षी ते शहीद झाले फक्त आदिवासींसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी…. इंग्रजांनी त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रलोभने दाखनली, त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान बिरसा मुंडांनी सांगितलं मला खरेदी केलं जाऊ शकत नाही. मला आमच्या आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून द्यायचेत, असं म्हणणारे भगवान बिरसा मुंडे कुठं? आणि अंदमानच्या जेलमधून बाहेर काढा, मी तुमची वाटेल ती मदत करतो म्हणत इंग्रजांना मदत करणारे सावरकर कुठे? असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद उभा राहिला आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाच्या मेळाव्यात उपस्थिती लावली. यावेळी सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना असली वीर संबोधलं तर सावरकरांना माफीवीर संबोधलं. राहुल गांधी यांच्या याच भाषणावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होतीये.
सावरकरांवरील राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहात? फडणवीसांच्या प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर

शरद पवारांवर टीका केल्यास अभिनेत्रीला महिनाभर तुरुंगात टाकलंत, मग राहुल गांधींवरही कारवाई कराच: रणजित सावरकर

याच महाराष्ट्रात शरद पवार यांच्याबाबत एका अभिनेत्रीने मजकूर रिट्विट केल्यावर तिला एक महिना तुरुंगात ठेवण्यात आले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील सभेत सावरकरांची नक्कल करून दाखवली, सावरकर हे काही भीक मागणारे होते का?, असा संतप्त सवाल रणजित सावरकर यांनी विचारला. काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करण्यात काहीही गैर नाही. पण काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना अटक करून भारत जोडो यात्रा तात्काळ रोखा, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here