दिल्ली एनसीआरमधील गाझियाबादमध्ये मित्रांच्या मस्करीला धक्कादायक वळण आलं. गाझियाबादच्या विजय नगरमधील कृष्णा नगर परिसरात मंगळवारी रात्री मित्रांनी खेळ सुरू केला. मित्राच्या अंगावर अंथरुण टाकायचं आणि त्याला मारहाण करायची अशा स्वरुपाचा हा खेळ होता. या खेळादरम्यान १७ वर्षांचा केशव बेशुद्ध पडला.

विशूनं केशवला मारताना पाहिलं. तो संतापला. त्यानं केशवच्या चेहऱ्यावर अंथरुण टाकलं आणि त्याचा गळा धरला. त्याच्या मानेवर त्यानं जोरात बुक्के मारले. या मारहाणीत केशवला गंभीर इजा झाली. तो बेशुद्ध पडला. तिथे असलेल्या सगळ्या तरुणांनी आरडाओरडा केला. विशूचे वडील ऋषीपाल गौतम यांनी लोकांच्या मदतीनं केशवला रुग्णालयात नेलं.
घटनेची माहिती केशवच्या कुटुंबियांना मिळाली. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनेनंतरचं वातावरण पाहून विशूनं पळ काढला. तो फरार झाला. केशवच्या वडिलांनी विशूच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी विशू विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. केशवचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचं नेमकं कारण कळू शकेल.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.