संकटामुळे फेक मेसेज, पोस्टचा आधीच पूर आला आहे. त्याला आवर घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत असताना आता मालवेअरचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यासाठी वेळीच पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
– फक्त अधिकृत मोबाइल अॅप डाऊनलोड करा.
– शक्यतो गुगल प्ले स्टोअरमधूनच कोणतेही मोबाइल अॅप डाउनलोड करा.
– कुठल्याही मोबाइल बँकिंग अॅपमध्ये ऑटो लागइनचा पर्याय वापरू नका.
– केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करतं त्याचे पालन करावे.
सोशल मीडियावर करडी नजर
करोनाच्या संकटात राज्यात काही गुन्हेगार व समाजकंटक या स्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्हेगार व समाजकंटकांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून याविरोधात धडक मोहीम राबवत आहे. त्यात प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज; ५४६ गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या काळात १७ जुलैपर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत ५४६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी सर्वाधिक २३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी २०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी २८, आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी १८ गुन्हे, इन्स्टाग्रामवर चुकीची पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे तर अन्य सोशल मीडियावरील आक्षेपार्ह क्लिप्ससाठी ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात २८७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुलडाण्यातील एका केसचा पोलिसांनी आवर्जून उल्लेख केला आहे. जिल्ह्यातील अमडापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. करोना महामारीच्या काळात एका व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारित करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल झाला. परिसरातील शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणामुळे हा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times