मुंबई: एलआयसी (LIC) ही देशांतर्गत शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. यामुळे कंपनीचा प्रत्येक गुंतवणूकदार एलआयसीवर लक्ष ठेवून असतो. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत १०५ कंपन्यांमधील हिस्सा कमी केला. एलआयसीने टाॅप १० शेअर्समध्ये २० हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

LIC चा शेअर घेणं फायद्याचं की तोट्याचं? वाचा काय आहे ब्रेकरेजचा सल्ला
या यादीत पहिले नाव देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे आहे. सप्टेंबर तिमाहीत मारुतीमधील ४.३२ दशलक्ष शेअर्स विक्री करून एलआयसीने आपला हिस्सा ४.८६ टक्क्यांवरून ३.४३ टक्क्यांवर आणला. प्राइम डेटाबेस ग्रुपच्या मते, कंपनीला या विक्रीतून ३,८१४ कोटी रुपये मिळाले.

तुमच्याकडेही LIC चा शेअर आहे का? मग व्हाल मालामाल… ब्रोकरेजही या समभागावर बुलिश
पॉवरग्रीड दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या सहा महिन्यांत मारुतीच्या शेअर्समध्ये २६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सेमीकंडक्टर चिप संकटाचे निराकरण आणि वेगवान मागणीमुळे कंपनीचे शेअर्स वाढले आहेत. सप्टेंबर तिमाहीत मारुतीचा निव्वळ नफा चार पटीने वाढून २,०६२ कोटी रुपये झाला आहे, तर कंपनीचा महसूलही ४६ टक्क्यांनी वाढून २९,९३०.८० कोटी रुपये झाला आहे. या यादीत सरकारी कंपनी पॉवरग्रीड दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आठ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत या कंपनीचे २४५२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

LIC Q2 Results: एलआयसीचे दुसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट निकाल, कंपनीचे प्रीमियम अनेक पटींनी वाढले
कोणत्या कंपनीचे शेअर्स विकले
एलआयसीने एनटीपीसीमध्येही काही नफा बुक केला. या वर्षात आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स ३५ टक्क्यांनी वधारले आहेत. एलआयसीने त्यात आपला हिस्सा ९.९७ टक्क्यांवरून ८.६१ टक्क्यांवर आणला आहे. एलआयसीने या कंपनीतील २,०६६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याचप्रमाणे एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत सन फार्मा, एचएएल, अल्ट्राटेक सिमेंट, सिमन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटोचे शेअर्स विकले.

सन फार्मामध्ये २३५६ कोटी रुपये, एचयुएलमध्ये २०३३ कोटी, एलएएलमध्ये १९४० कोटी, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये १४८२ कोटी, सिमन्समध्ये १४३५ कोटी, ब्रिटानियामध्ये १२३५ कोटी आणि बजाज ऑटोमध्ये १००५ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here