त्यासंदर्भामध्ये मी आजच एक पत्र देत आहे आणि माझ्या निधीतून ही सोलर व्यवस्था या ठिकाणी उभी केली जाणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दुसरीकडे, अग्निशामक दलाचा निष्काळजीपणा या वेळेस समोर आलेला आहे. जर आग मोठी असती आणि पाण्याची गरज लागली असती तर पाणी नसलेल्या गाडीचा काय उपयोग झाला असता? असा सवाल रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे हा निष्काळजीपणा सुद्धा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो त्यामुळे अग्निशामक दलाने सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे.
pune kothrud buliding fire, Pune News : रहिवासी सोसायटीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांची एकच धांदल; पाहा Video झालं तरी काय – a fire broke out in a residential society in pune but there was no water in the fire
पुणे : पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. एसआरए च्या १४ मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या ६ गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, यातील एका गाडीमध्ये पाणी नसल्याने जवानांची चांगलीच धांदल उडाली होती. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणावर स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.