बाडमेर: राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनं पतीचं गुप्तांग कापल्याचा प्रकार बाडमेरमध्ये घडला आहे. पती झोपला असताना पत्नीनं त्याचं गुप्तांग ब्लेडनं कापलं. अचानक झालेल्या हल्ल्यानं पतीला जाग आली. तो जोरजोरात ओरडू लागला. धोरीमन्ना भलीसर गावात ही घडला. ही घटना १ ऑक्टोबरला घडली. त्यानंतर मंगळवारी पतीनं पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

आटा-साटा परंपरेनुसार विवाह झाला होता. महिलेला पतीपासून वेगळं व्हायचं होतं. तिला दुसरं लग्न करायचं होतं. त्यासाठी तिनं झोपलेल्या पतीच्या गुप्तांगावर ब्लेडनं हल्ला केला. प्रकरण सोडवण्यासाठी जवळपास सहा महिने प्रयत्न सुरू होते. सामाजिक स्तरावर पंचायत बोलावण्यात आली. मात्र त्यातून कोणताच मार्ग निघाला नाही. यानंतर पतीनं पोलीस तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाची वैद्यकीय चाचणी केली. तरुणाला झालेली जखम बरी झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं. त्यामुळे आता पोलीस पत्नीची चौकशी करत आहेत.
आँख बंद टपली महागात पडली! मित्रांना रात्री खेळ सुरू केला अन् होत्याचं नव्हतं झालं
सहा महिन्यांपूर्वी गोमाराम यांचा विवाह कानूदेवी यांच्याशी झाला. कानूदेवी सनावडा बाडमेरची रहिवासी होती. ब्लेड हल्ल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. त्यावेळी पती शेतात झोपला होता. यावेळी पत्नी फोनवर बहिणीशी बोलत होती. त्यावेळी तिचा काही कारणावरून वाद झाला. थोड्या वेळानं तिनं पतीच्या गुप्तांगावर ब्लेडनं हल्ला केला.

पत्नीनं ब्लेडनं हल्ला करताच पती वेदनेनं विव्हळला. त्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सगळे जण झोपेतून उठले. दुसऱ्या दिवशी सकाळी पतीनं खासगी रुग्णालय गाठलं आणि उपचार घेतले. यानंतर जवळपास महिनाभर प्रकरण पंचायतीत होतं. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाल्यानं पतीनं पोलीस ठाणं गाठलं.
ऐकावं ते नवलच! इथे चक्क बकरे देताहेत दूध; किंमत किती? आकडा पाहून चाट पडाल
पत्नीनं पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. बहिण आणि तिच्या पतीनं मला पतीचं गुप्तांग कापण्याचा सल्ला दिला. यामुळे पती नपुंसक होईल. मग तुला घटस्फोट घेणं सोपं होईल आणि तुझ्या आवडत्या मुलाशी लग्न करता येईल, असं बहिण आणि भावोजींनी सांगितल्यानं मी पतीचं गुप्तांग कापल्याचं आरोपी पत्नीनं चौकशीत सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here