Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे (Mumbai News) येणाऱ्या मार्गावर झाला आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं :

1. अब्दुल रहमान खान, 32 वर्षे, घाटकोपर
2. अनिल सुनिल सानप
3. वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी
4. राहुल कुमार पांडे, वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई
5. आशुतोष नवनाथ गांडेकर, 23वर्षे अंधेरी, मुंबई

Reels

गंभीर जखमी :

1. मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्ष (चालक)
2. अमीरउल्ला चौधरी
3. दिपक खैराल

किरकोळ जखमी :

1. अस्फीया रईस चौधरी, 25 वर्षे. कुर्ला, मुंबई

अपघातामुळे वाहतूक कोंडी… 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, अपघातग्रस्त आर्टीगा कारही एक्स्प्रेसवेवरुन हटवण्यात आली आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here