मुंबई: मुंबईत येथेल स्टुडिओमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी आगीत स्टुडिओमधील सेट जळून खाक झाला आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ( Fire Breaks Out On The Sets of Kumkum Bhagya )

वाचा:

किलिक निक्सन स्टुडिओमध्ये शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ” या मालिकेचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावर आग लागली. या ठिकाणी असलेल्या एसीमधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याने सर्व कलाकार, कर्मचारी यांनी प्रसंगावधान बाळगत स्टुडिओमधून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला.

वाचा:

राज्य सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्टुडिओमध्ये शुटिंगला सुरुवात झाली होती. मात्र आगीच्या घटनेमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

दरम्यान, कुमकुम भाग्य या मालिकेत शब्बीर अहलूवालिया, शृती झा, मुग्धा चाफेकर, कृष्णा कौल यांच्या प्रमुख भूमिका असून बालाजी टेलिफिल्म्सच्या लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका आहे. झी टीव्हीवर ही मालिका प्रसारित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here