मुंबई: गेल्या वर्षभरात पाच टेक स्टार्टअप कंपन्यांच्या आयपीओबाबत बाजारात सर्वाधिक चर्चा झाली. पण या पाच आयपीओच्या मूल्यांकनात तब्बल १८ डॉलर अब्जचा फटका बसला आहे. या पाच कंपन्यांमध्ये Paytm, झोमॅटो, नायका, Delhivery आणि पॉलिसीबझार या नावांचा समावेश आहे. या कंपन्यांनी त्यांचे आयपीओ अत्यंत महागड्या मुल्यांकनात बाजारात उतरवले. तर या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागला.

वर्ष २०२१ मध्ये या कंपन्यांनी आयपीओद्वारे १८ अब्ज डॉलर उभे केले, मात्र गुंतवणूकदार या उच्च-प्रोफाइल टेक स्टॉकपासून आता दुरावले आहेत. जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. पण दिग्गज स्टार्टअप कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून ७५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

पेटीएम (वन 97 कम्युनिकेशन्स, नायका (एफएसएन ई-कॉमर्स), झोमॅटो, पॉलिसीबाझार (पीबी फिनटेक) आणि दिल्लीवरी या पाच इंटरनेट-आधारित कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे २.४३ लाख कोटी रुपये पाण्यात बुडले आहेत. लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४.३२ लाख कोटी रुपयांच्या जवळपास होते, जे आता केवळ १.८९ लाख कोटी रुपयांवर घसरले आहेत.

IPO इश्यू किमतीच्या खाली पेटीएमचा शेअर
दुसऱ्या सर्वात मोठ्या किमतीचा आयपीओ आणणारी पेटीएम कंपनी सध्या सर्वात वाईट स्थितीत आहे. पेटीएमची इश्यू किंमत २१५० रुपये होती, जी आता ५३९.८० रुपयांच्या आसपास आहे. पेटीएमच्या शेअरमध्ये त्याच्या इश्यू किमतीच्या तब्बल ७५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे बाजार भांडवल १,३९,००० कोटींवरून ३५,०४१ कोटींवर घसरले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे १.०५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत.

नायकाने चमक गमावली
नायकाचे मार्केट कॅप लिस्टिंगच्या दिवशी १.०४ लाख कोटी रुपये होते, जे आता ५२,८६४ कोटींवर आले आहे. नायकाने प्रति शेअर ११२५ रुपये दराने आयपीओ जारी केला होता. तर कंपनीने एका शेअरसाठी पाच बोनस शेअर जारी केले. त्यांच्या मते, शेअर ४२८.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले होता, जो आता १८५ रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. कंपनी त्याच्या आयपीओ किमतीच्या खाली ट्रेडिंग करत आहे.

झोमॅटोनेही केले निराश
लिस्टिंगनंतर झोमॅटोच्या स्टॉकमध्ये मोठी तेजी आली. पण लॉक-इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यांचे समभाग विकले. ७६ रुपयांच्या इश्यू प्राइसनंतर कंपनीचा शेअर १६९ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता पण आता तो ६७.७० रुपयांवर व्यवहार करत आहे. २३ जुलै २०२१ रोजी झोमॅटोचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपये होते, जे आता केवळ ५७,८९५ कोटी रुपये राहिले आहे.

पॉलिसीबाझार आयपीओ किमतीच्या खाली
पॉलिसी बाजारची इश्यू किंमत ९८० रुपये होती, जी आता ३७१.५५ रुपयांवर म्हणजेच ६२ टक्क्यांनी कमी झाली आहे. पॉलिसीबाजारच्या गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात धक्का दिला ठरला आहे. हा शेअर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आणि नंतर त्याचे मार्केट कॅप ५४,०७० कोटी रुपये होते. आणि आता ते १६,७०१ कोटींवर घातले आहे.

दिल्लीवरीच्या गुंतवणूकदारांचे नुकसान
लॉजिस्टिक कंपनी, दिल्लीवेरीने प्रति शेअर ४८७ रुपये दराने आयपीओ बाजारात आणला होता, पण सध्या शेअर ३६७.३० रुपयांवर म्हणजेच आयपीओ किमतीपेक्षा २५% खाली ट्रेडिंग करत आहे. कंपनीचे आयपीओ पूर्वीचे मूल्यांकन ३५,२८३ कोटी रुपये होते, जे आता २६,६९८ कोटी रुपये झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here