हल्दवानी : उत्तराखंडच्या हल्दवानी इथे एक घर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, या घरात आग लागण्याच्या विचित्र घटना घडत आहेत. घरातील माणसे बादलीभर पाणी घेऊन झोपत असल्याची परिस्थिती सध्या आहे. जेणेकरून आग लागल्यास ती विझवता येईल. हल्दवानी इथे महापालिका कार्यालयाजवळ राहणाऱ्या कमल पांडे यांचे कुटुंब सध्या एका विचित्र दहशतीत जगत आहे. गेल्या आठवडाभरापासून घरात कुठेही, केव्हाही अचानक आग लागते. कधी घराच्या बंद कपाटात आग लागते तर कधी ज्या पलंगावर व्यक्ती झोपलेली असते त्यातून धूर निघू लागतो.

सध्या परिस्थिती अशी आहे की, पांडे कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील विद्युत वायरिंग देखील बदलून टाकली आहे. वीज कनेक्शनही तोडण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही अचानक आग लागण्याची प्रक्रिया थांबली नाही. पांडे कुटुंबातील मुलगी दीप्ती त्रिपाठी सांगते की, चंद्रग्रहणाच्या दिवसापासून हा प्रकार सातत्याने घडत आहे. कुटुंबातील सदस्य एका खोलीत आग विझवायला जातात, अशा वेळी दुसऱ्या खोलीत आग लागते. घरातील वडील चंद्रा पांडे सांगतात की अशा कूलरलाही आग लागली आहे, ज्याचे विजेचे कनेक्शन तोडले आहे. यासोबतच बंद कपाटाला अचानक आग लागली आहे. गेल्या आठवडाभरात पांडे यांच्या घराला एकापाठोपाठ अकरा वेळा आग लागली आहे.

अंघोळीसाठी गिझर चालू केला पण झाली मोठी चूक, गर्भवती असलेल्या जनरल मॅनेजरचं क्षणात आयुष्य संपलं
बादलीत पाणी घेऊन झोपतंय कुटुंब…

सुरुवातीला पांडे कुटुंबीयांना वाटले की, अर्थिंगमुळे घराला आग लागत असावी. त्यानंतर वीज विभागाने घरात अर्थिंगचे कामही केले. जुने वीज कनेक्शनही तोडण्यात आले. मात्र, असे असतानाही कधी बंद कुलरमध्ये तर कधी अंगणात सुकण्यासाठी ठेवलेल्या कपड्यांना आग लागते. हे सर्व पाहून शेजाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. घराचे मालक कमल पांडे सांगतात की त्यांना घरात राहून जवळपास ७० वर्षे झाली आहेत. मात्र, आजपर्यंत अशी कोणतीही घटना घडलेली नाही. त्यांच्या घरात काय चालले आहे ते कुटुंबाला समजत नाही. परिस्थिती अशी आहे की संपूर्ण कुटुंबाने घर सोडले आहे.

घरातील वडिलधार्‍यांना व मुलांना शेजारीच भाड्याच्या घरात राहावे लागत असून काही लोक खोल्यांमधून बाहेर आल्यावर व्हरांड्यात झोपले आहेत. जे घराच्या व्हरांड्यात झोपतात, त्यांच्यासमोर पाण्याने भरलेल्या बादल्या चोवीस तास ठेवल्या जातात. जेणेकरून आग लागल्यास ती त्वरित विझवता येईल. पण या सगळ्यात लोकांना या गूढ आगीचे कारण समजू शकलेले नाही.

छाती वाजतेय का…नाही…मग गेला? पतीला संपवून प्रियकराला फोन, ‘असा’ झाला हत्येचा उलगडा
पोलिसांना तपासाचे आदेश…

कुटुंबातील सदस्यही आता भुताटकीविषयी बोलू लागले आहेत. खरंतर, घरातील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या घराजवळून एक कालवा जात आहे. जे झाकण टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. ज्यासाठी कालव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. कालव्याचे खोदकाम सुरू झाल्यापासून घराला आग लागण्याचे प्रकार सुरू आहेत. गूढ आग लागल्याची माहिती मिळताच हल्द्वानीचे शहर दंडाधिकारी रिचा सिंगही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.

राहुल गांधींना सावरकरांविरुद्ध वक्तव्य पडलं महागात, ठाण्यात शिंदे गटाने उचललं मोठं पाऊल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here