पुणे: शहर जिल्ह्यात शनिवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजाराच्या पुढे गेली आहे. तर ३९ जणांचा शहर जिल्ह्यात मृत्यू झाल्याने धोका अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात ऑक्सिजनवरील सुविधेचा ताण वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ( )

वाचा:

पुणे शहर जिल्ह्यात रुग्णसंख्येची वाटचाल ५० हजारच्या दिशेने सुरू आहे. शनिवारी २०८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यासह तसेच ग्रामीणमध्येही रुग्ण वाढले आहेत. शहरात शनिवारी अन्टीजेन आणि प्रयोगशाळांच्या अशा एकूण सात हजारापर्यंत चाचण्या पोहोचल्या. शहरात ७७४ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत २१ हजार ८८१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ६२ एवढी झाली आहे तर शहरातील रुग्णालयांमध्ये ५४७ रुग्ण गंभीर आहेत. त्यातील ४५८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ८९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहर जिल्ह्यात ३९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा १२८६ झाला आहे.

वाचा:

पिंपरी चिंचवडने १० हजारचा टप्पा ओलांडला

पिंपरी चिंचवडमधील बाधितांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कडक लॉकडाऊनच्या काळातही जवळपास अडीच हजार नवीन रुग्णांची वाढ आढळून आली. त्यामुळे रुग्ण बरे करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण आढळण्याचा उच्चांक होत आहे. शहराच्या सर्वच भागांत रुग्ण आढळत आहेत. दिवसाला ४०० ते ५०० जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून (१४ जुलै) दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, या कालावधीत देखील रुग्णवाढ वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील रुग्णसंख्या १४ जुलैअखेर आठ हजार होती. त्यानंतर पाच दिवसांत अडीच हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णवाढ दिसून येत असल्यामुळे यापुढील काळात उपचारांवर भर देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरची (सीसीसी) संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पालिकेकडील उपलब्ध माहितीनुसार, सर्वाधिक तरुण करोनाने बाधित झाले आहेत. वयवर्ष २२ ते ३९ गटातील चार हजार ५२ तरुण बाधित आहेत. त्याखालोखाल ४० ते ५९ वयोगटातील दोन हजार ८३५ जणांना लागण झाली आहे. १३ ते २१ वयोगटातील एक हजार ५२ आणि १२ वर्षांपर्यंतच्या ९३८ लहान मुलांना लागण झाली आहे. साठ वर्षांहून अधिक वयोगटाचे एक हजार १९७ ज्येष्ठ नागरिक करोनाबाधीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here