पुणे : मुलाच्या अकाली निधनाच्या धक्क्याने वडिलांचाही करूण अंत झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील नांदेड सिटीत राहणाऱ्या दिलीप सातपुते यांना चिन्मय सातपुते हा एकुलता एक मुलगा होता. वडिलांनी त्याला संगणक अभियंता केले. संगणक अभियंता म्हणून चिन्मय हा विमान नगर येथील आयटी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. मात्र बुधवारी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील कर्ता-धर्ता मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाच्या निधनाला काही दिवस उलटताच या धक्क्याने वडील दिलीप सातपुते यांनीही आपले प्राण सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नांदेड सिटीत गेल्या सहा वर्षांपासून सातपुते कुटुंब वास्तव्यास आहे. वडील दिलीप सातपुते हे महावितरणमधील कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत. तर मुलगा चिन्मय हा संगणक अभियंता होता. चिन्मयची पत्नी दीपा ही शिक्षिका म्हणून एका शाळेत कार्यरत आहे. मुलाचा सुखी संसार सुरू असताना दिलीप सातपुते हे आपल्या निवृत्तीचा आनंद घेत होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने अचानक चिन्मय याचं वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झालं. त्याच्या निधनाने ७१ वर्षीय वडील पुरते कोसळले आणि संपूर्ण कुटुंब हादरून गेले.

श्रद्धा प्रकरण ताजे असताना मुंबई पुन्हा हादरली; प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन ढकललं, नंतर…

चिन्मय याला बॅडमिंटन आणि पोहण्याची प्रचंड आवड होती. उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तो परिसरात परिचित होता. तर दुसरीकडे दिलीप यांचा स्वभाव शांत, हळवा. आपल्या नातवंडासोबत ते आनंदाने आयुष्य घालवत होते. मात्र चिन्मय हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाचा धक्का ते सहन करून शकले नाहीत. त्याच्या विरहाने त्यांनी प्राण सोडले आहेत.

दरम्यान, सातपुते कुटुंबात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here