वेलिंग्टन: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन दिवसीय टी-२० मालिका होणार आहे. उभय संघांमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीशिवाय असेल. वरिष्ठ खेळाडूच्या अनुपस्थितीत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

या मालिकेचा पहिला सामना आज वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु इथे पाऊस सुरु झाला असल्याने आजच्या सामन्याचा टॉसला उशीर होऊ शकतो. वेलिंग्टनमधील वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार ११:३०) ८१ टक्के पावसाची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ ला सुरु होणार आहे. जसजसा दिवस पुढे सरकतो. तसतशी पावसाची शक्यता कमी होते परंतु, अजूनही ४९ टक्के पावसाची शक्यता आहे. असं अंदाज अक्यूवेदरने वर्तवला आहे.

वेलिंग्टन मध्ये सततच्या पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे, असे ट्विट बीसीसीआईने देखील केले आहे.

टी-२० विश्वचषकानंतर जवळजवळ ५ दिवसांनी भारत आणि न्यूझीलंडमध्ये ही टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे.

तर न्यूझीलंडचा संघ एका नवीन युगात गेला आहे, त्यांनी ट्रेंट बोल्ट आणि मार्टिन गप्टिल सारख्या उत्कृष्ट खेळाडूंना या मालिकेमध्ये खेळण्यासाठी त्यांची निवड केली नाही. यामागील कारण म्हणजे त्यांच्याकडे आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा केंद्रीय करार नाही. भारतीय संघात संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि उमरान मलिक या खेळाडूंना संधी मिळाली आहे. शुभमन गिल या नव्या दमाच्या युवा खेळाडूला देखील ही टी-२० मालिका खेळण्यासाठी संघात सामील केले आहे.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ – हार्दिक पांड्या(कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुद्दा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघ – केन विलियम्सन(कर्णधार), फिन अलेन, मायकल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ब्लेयर टिकनर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here