अहमदनगर : रागाच्या भरात अनाथालयातून निघून गेलेले एका तरुणीला (वय २९) शिर्डीत भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. तिच्या बाबतीत जे काही घडले, ते उघडकीस यायलाही महिना लागला. रात्रीच्या वेळी तिला एकटीला पाहून काही तरुणांनी तिला जेवण देतो असे सांगून आपल्या खोलीवर नेते आणि तेथे सामुहिक अत्याचार केला. हा प्रकार आता उघडकीस आला असून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपींना शोधण्याचे आणि पुरावे संकलित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

जुलै महिन्यात शिर्डीत ही घटना घडली आहे. त्यानंतर तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यातून सावरल्यानंतर तिचे आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. त्यामुळे अनाथालयाच्या मदतीने नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील एका अनाथालयात ही तरुणी राहते. जुलै महिन्यात रागाच्या भरात ती अनाथालयातून. १४ जुलै २०२२ रोजी निघून गेली. ती शिर्डीत मंदिराच्या परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीच्या आधी काही दिवस आधी रात्रीच्यावेळी काही तरुण तिच्याजवळ आले. तुला पोटभर जेवण देतो, असे सांगून ते तिला घेऊन गेले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला.

अंघोळीसाठी गिझर चालू केला पण झाली मोठी चूक, गर्भवती असलेल्या जनरल मॅनेजरचं क्षणात आयुष्य संपलं
यानंतर या तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे तसेच ती गरोदर असल्याचेही यावेळी लक्षात आले. शुद्धीवर आल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी या तरुणीने नगरच्या एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने दिवाळीच्या आधीच घटना कथन केली असली तरी त्यापूर्वीही तिच्यावर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने तिच्याकडून माहिती काढण्याचेही मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शिर्डीला जाऊन घटनेची अधिक माहिती घेतली, पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

चंद्रग्रहणापासून घरात सतत लागतेय आग, कुटुंबीय घाबरले; पोलिसांनाही रहस्य उलगडेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here