girls fight in nashik on road: नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

या आधीही नाशिकमध्ये विद्यार्थिनींच्या मारामारीचे असेच व्हिडिओ समोर आले आहेत. नाशिकमधील एका महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. शाळेच्या मैदानात दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. ही फ्री स्टाईल फाईट कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या पटांगणात ही घटना घडली होती. त्यावेळीही दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवत होते. मात्र काही वेळाने दोघांचे काही मित्र पुढे आले आणि त्यांनी दोघांना वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉलेजने दोघांनाही ताकीद देऊन सोडले होते. दरम्यान आता पुन्हा असाच एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता कॉलेजच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सदर महाविद्यालय प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.