man sold his son: नागपूरमधील चिखली परिसरातील आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याविरोधात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. दाम्पत्य अनेक वर्षांपासून मुलांच्या खरेदी-विक्रीत सक्रिय असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वत:च्या मुलालादेखील २५ हजार रुपयांना विकलं.

 

boy sold
नागपूर: नागपूरमधील चिखली परिसरातील आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याविरोधात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. दाम्पत्य अनेक वर्षांपासून मुलांच्या खरेदी-विक्रीत सक्रिय असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वत:च्या मुलालादेखील २५ हजार रुपयांना विकलं. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरुद्ध नव्यानं गुन्हा दाखल केला आहे.

आठ महिन्यांच्या चिमुरड्याची विक्री केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी योगेंद्र प्रजापतीची चौकशी सुरू केली. छत्तीसगडमधील एका दाम्पत्याला स्वत:चं मुलं विकल्याची कबुली त्यानं दिली. जून २०२२ मध्ये यासाठीचा सौदा झाला होता. त्यावेळी प्रजापती दाम्पत्य राजनांदगावमध्ये वास्तव्यास होतं. योगेंद्र पत्नी पाचव्यांदा गर्भवती असताना तिला भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तेथे आणखी एक महिलादेखील दाखल झाली होती. या महिलेच्या एका नातेवाईकसोबत प्रजापतीची ओळख झाली. सुरेंद्र मेश्राम असं त्याचं नाव होतं.
आयुष्य इतकंही कठोर नसावं! दोन लेकींसह वडिलांनी जीवन संपवले; डायरी वाचून सारेच हळहळले
मेश्राम यांना मूलबाळ नव्हतं. त्यांच्याशी बोलता बोलता प्रजापतींनी आपल्याला चार मुलं असल्याचं सांगितलं. मेश्राम यांनी प्रजापतीकडे एक मूल देण्याची विनंती केली. त्याबदल्यात २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. प्रजापतीनं एक वर्षाच्या सनीची मेश्राम दाम्पत्याला विक्री केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाची खरेदी करणाऱ्या राजनांदगाव येथील मेश्राम दाम्पत्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात भररस्त्यात पोरींची ‘दंगल’; थोबाडीत दिल्या, झिंज्या ओढल्या; पोरींना पाहून पोरं चेकाळली
प्रजापतीचा विवाह २०१७ मध्ये झाला. पाच वर्षांतच दाम्पत्याला पाच मुले-मुली झाल्या. यावर विश्वास ठेवणं पोलिसांना कठीण जात आहे. राजनांदगावमध्ये विक्री करण्यात आलेला मुलगा स्वत:चा असल्याचा दावा प्रजापतीनं केला. तो मुलगा खरोखरच प्रजापतीचा आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here