Crime News: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका दागिन्यांच्या दुकानात दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दोन महिलांनी शिताफीनं चोरी केली. सोनाराच्या दुकानात खरेदीच्या बहाण्यानं गेलेल्या महिलांनी सोन्याच्या ९ चमकी (नाकात घालण्याचा दागिना) तोंडात टाकल्या. त्यानंतर त्या तिथून पसार झाल्या.

महिला निघून गेल्यानंतर दुकानदार विरेंद्र यांनी ट्रेमधील चमकी पाहिल्या. त्या कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. ग्राहक म्हणून आलेल्या दोघींनी चमकी तोंडात टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणी विरेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिला कोण आहेत, त्या कुठून आल्या होत्या, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या महिलांनी आधीही सोनाराच्या दुकानात चोऱ्या केल्या असाव्यात असा अंदाज आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.