वी दिल्ली : श्रद्धाचा मारेकरी आफताबची क्रूरता, त्याने श्रद्धाला दिलेली वागणूक हृदय पिळवटून टाकणारी आहे. आफताबच्या अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहे. तो श्रद्धाला मारहाण तर करायचाच, शिवाय तिचा मानसिक छळही करत होता. त्याने श्रध्दाला केलेल्या मारहाणीचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता श्रद्धाचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये श्रद्धा एका मित्राशी बोलत असून आफताबच्या क्रूरतेचाही उल्लेखही तिने या चॅटमध्ये केला आहे.

२४ नोव्हेंबर २०२० च्या या चॅटमध्ये श्रद्धा आपल्या मित्राशी बोलत होती. रिपोर्टनुसार, या चॅटमध्ये श्रद्धाने तिच्यासोबत होणाऱ्या मारहाणीबद्दल सांगितलं होतं. या चॅटमध्ये श्रद्धाने असं म्हटलं होतं, की आफताब आता लवकरच त्याच्या घरी जाणार आहे. आफताबने तिला इतकी मारहाण केली, की ती बेडवरून उठूही शकत नाही असं तिने मित्रासोबत केलेल्या चॅटमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा –
Shraddha Walker Death Case: गुगलवर त्यादिवशी काय सर्च करत होता आफताब, श्रद्धाच्या हत्येचा आणखी एक खुलासा

श्रद्धाने चॅटमध्ये काय म्हटलं?

– काल त्याच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्व काही ठीक झालं.
– आज तो जात आहे.
– पण मी आज जात नाहीये. कारण त्याने मला अतिशय वाईटरित्या मारहाण केली आहे. माझं बीपी लो झालं आहे आणि माझ्या शरीरावर जखमेच्या खूणा आहेत. बेडमधून उठण्याएवढीही ताकद नाहीये.
– तो माझ्या घरातून आजच जावा.
– माझ्यामुळे झालेली असुविधा आणि कामावर होत असलेल्या परिणामांसाठी मी तुझी माफी मागते, असंही श्रद्धाने आपल्या मित्राला चॅटमध्ये म्हटलं होतं.

Shraddha Walker Whatsapp Chat

या व्हायरल फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याच्या खूणा दिसत आहेत. फोटोमध्ये श्रद्धाच्या नाकावर, गालावर तसंच मानेवर जखमा दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, २०२० मध्येच श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिने पाठ, मान दुखत असल्याचं सांगितलं होतं. यावरुन त्या दोघांमध्ये दोन वर्षांपासूनच अनेक गोष्टी ठीक नसल्याचं समोर येतं.

Shraddha Walker

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात दररोज अनेक नवे खुलासे होत आहे. आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शरीराचे काही तुकडे आणि डोकं त्याने पाच महिन्यांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर काही तुकडे हत्या केल्यानंतर महिन्याभरात शहरातील विविध ठिकाणी फेकले. आता पोलिसांकडून या शरीराच्या तुकड्यांचा शोध सुरू आहे. काही तुकडे मिळाले असून श्रद्धाचं डोकं मात्र अजून सापडलेलं नाही.

1 COMMENT

  1. We fire up with 14 chief window manufacturers in the USA. We know what technological innovations, promotions, special offers are currently available. Installation Company[url=https://aspectmontage.com/] aspectmontage window replacement [/url] Boston. Also, we sire a program instead of shrewd the financing of replacement and installation of windows with a monthly payment.
    You can send knowledge about your scale: what windows are needed, what lone wishes. We resolve in you within an hour and we can furnish the unsurpassed finding out quest of You.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here