या सर्व वादंगाचे पदसाद आज दिवसभर सोशल मीडियावर पाहायला मिळाले. या वादावर ट्विटरवर मीम्सचा पाऊल पडल्याचे दिसले. मनसेचे कार्यकर्ते शेगावमध्ये तेथील प्रसिद्ध कचोरी खाण्यासाठी येत आहेत, अशी प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले.
आता हेच पाहा ना…जिओ बायडेन या नावाचा एक यूजर काय लिहितो पाहा… तो लिहितो, ‘ ब्रेकिंग: राजसाहेबांच्या आदेशाने मोठ्या संख्येने मनसैनिक शेगावात दाखल, शेगाव कचोरीवर सेटलमेंट होण्याची शक्यता.’
या बरोबरच आणखी एका यूजरने कचोरीचाच उल्लेख केला आहे. डॉ. दत्ता या नावाच्या एका यूजरने म्हटले आहे की, ‘या आणि शेगावची कचोरी खाऊन वापस जा.’
एका वापरकर्त्यांने तर खास वैदर्भीय भाषेत मनसेला टोला लगावला आहे. जमीर टी या नावाचा हा यूजर म्हणतो, ‘खर तर मनसे कार्यकर्ते शेगावची कचोरी खायला येवू राहिले.’
मनसेच्या गजानन काळेंचा राहुल गांधींना टोला
मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबईचे प्रमुख गजानन काळे यांनी देखील राहुल गांधींवर भाष्य केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ आज सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आपलं थोबाड बंद ठेवलं हे बर झालं..हा महाराष्ट्र आहे इथल्या अस्मिता व प्रतीकांबद्दल बोलाल तर असाच संताप उसळणार ..’याद राखा’ हा इशारा देण्यासाठी मनसे नेते व महाराष्ट्रसैनिकांनी उचललेले पाऊल याच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.’
मात्र गजानन काळे यांच्या या ट्विटला ट्विटर यूजर जमीर टी यानेच पुन्हा उत्तर दिले आहे. तो म्हणतो, येड्याला वाटतंय यांच्यामुळेच
आशीष नावाचा आणखी एक यूजर लिहितो, ‘ब्रिजभूषण पण शेगावमध्ये दाखल होणार आहेत…. तेव्हापासून मनसे वाले काही दिसत नाहीत ही बातमी खरी आहे का?’