नवी दिल्ली: मूळची वसईची रहिवासी असलेल्या २६ वर्षांच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. श्रद्धाचा २८ वर्षीय प्रियकर आफताब अमीन पुनावालानं श्रद्धाला गळा दाबून संपवलं. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे निर्घृणपणे ३५ तुकडे केले. त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावली. आफताबनं पोलिसांकडे हत्येची कबुली दिली आहे. मात्र पोलिसांना अद्यापही आफताबविरोधात पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आफताबला न्यायालयात दोषी कसं सिद्ध करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

आफताबनं दिलेली माहिती आणि त्याच्याबद्दल समोर येणारा तपशील पाहता आता पोलिसांना वेगळीच शंका येऊ लागली आहे. आफताब सीरियल किलर असावा अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या तरुणींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. आफताबचं बंबल ऍपवर अकाऊंट आहे. याच ऍपच्या माध्यमातून आफताबनं अनेक तरुणींशी मैत्री केली. यातील बऱ्याच जणींना त्यानं घरीदेखील बोलावलं होतं. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
श्रद्धा प्रकरण ताजं असताना हायवेच्या शेजारी सापडली लाल सुटकेस; उघडताच परिसरात खळबळ
आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यानं एका तरुणीला घरी बोलावलं होतं. त्या तरुणीची ओळखही बंबल ऍपच्या माध्यमातून झाली होती. आफताब सिम बदलून नवे नवे सोशल मीडिया अकाऊंट तयार करायचा आणि नव्या तरुणींशी मैत्री करायचा. श्रद्धाला निर्घृणपणे संपवल्यानंतरही तो आरामात जगत होता. या कालावधीत त्यानं काही तरुणींशी मैत्री केली होती.

श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब तिचं सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. तिच्या मित्रमैत्रिणींच्या मेसेजला रिप्लाय देत होता. मात्र जूनमध्ये रिप्लाय बंद झाले. त्यानंतर श्रद्धाच्या मित्रानं तिच्या वडिलांशी संपर्क साधला. श्रद्धाचा संपर्क होत नसल्याचं त्यानं वडिलांच्या कानावर घातलं. त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं.
श्रद्धाला संपवणाऱ्या आफताबचा गेम ओव्हर? ५ जणांच्या एंट्रीनं तपास महत्त्वाच्या वळणावर
आफताबनं सुरुवातीला चौकशीत उडवाउडवीची उत्तरं दिली. माझं आणि श्रद्धाचं भांडण झालं. ती मोबाईल घेऊन निघून गेली. २२ मेपासून तिचा आणि माझा संपर्क नाही, असं आफताबनं सांगितलं. मात्र त्यानंतर पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाच्या मोबाईलचं लोकेशन काढलं. २२ मे रोजी श्रद्धा तुम्ही राहत असलेला फ्लॅट सोडून गेली, मग त्यानंतरही दोघांच्या मोबाईलचं लोकेशन सारखंच कसं, असा प्रश्न पोलिसांनी विचारला आणि आफताब गडबडला. यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here