बांदा, : करोना संसर्गामुळे देशात आरोग्य आणि आर्थिक अशा दोन्ही स्थरांवर नागरिकांना समस्या झेलाव्या लागत आहेत. देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मुंबईतून कसाबसा उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी पोहचलेल्या २२ वर्षीय तरुणानं काम न मिळाल्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येतंय.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील इंगुआ गावात ही घटना घडलीय. या २२ वर्षीय तरुणाचं नाव मनोज असल्याचं सांगण्यात येतंय. एका झाडाला दोरखंडाच्या सहाय्यानं गळफास लावून घेत मनोजनं आपलं आयुष्य संपवली.

वाचा :

वाचा :

मनरेगा योजनेतूनही रोजगार नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगुआ गावातील जंगलात एका तरुणाचा मृतदेह झाडाला लोंबकळलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृताचा भाऊ रामसेवक याच्याकडे चौकशी केली असता, ‘मनोज मे महिन्यात मुंबईतून उत्तर प्रदेशात परतला होता. परंतु, गावात परतल्यानंतर मनोजच्या हाताला कुठलंही काम मिळालं नाही. यावेळी त्याला आर्थिक विवंचना सतावत होती. बुधवारी दुपारपासून तो गायब होता’ अशी माहिती मिळाली.

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवल्याचं सांगितलं. तसंच आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मनोज हा कुटुंबात चार भावंडांमध्ये सर्वात लहान होता. उत्तर प्रदेशात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेनुसारही त्याला काम मिळालं नाही. त्याची आर्थिक परिस्थिती त्याला खूपच चिंतेत टाकत होती.

वाचा :

वाचा :

आत्महत्येचं वाढतं प्रमाण

उल्लेखनीय म्हणजे, लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या राज्यांतून आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरीत मजुरांमध्ये सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेश आणि बिहारची होती, असं आकडेवारी सांगते. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून गेल्या काही दिवसांत आत्महत्येच्या घटनांत वाढ झालेली दिसून येतेय. केवळ बांदा जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान जवळपास २२ जणांनी केल्याची माहितीही समोर येतेय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here