औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगावजवळ भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसंच पोलिसांनाही या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना बाहेर काढण्यात आलं. मात्र गंभीररीत्या जखमी झालेल्या चार जणांनी जागीच प्राण सोडले होते. इतर पाच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एसटी महामंडळाला एडीबी निधीचे बळ; विद्युत बस खरेदीसाठी देणार ४० कोटी डॉलर

रतन शांतीलाल बेडवाल (वय ३८), सुधीर पाटील (५०), रावसाहेब मोठे (५०), भाऊसिंग गिरासे (४५) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर जखमींमध्ये शशीकला भाऊराव कोराट (७०), सिद्धार्थ जंगले (१४), हेमंत जंगले (५५), छाया हेमंत जंगले (३५), कुंतला दिगंबरराव जंगले (७०, रा. अमरावती) यांचा समावेश आहे.

दरम्यान, या अपघाताने कायगाव परिसरात खळबळ उडाली असून चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here