नवी दिल्ली : देशाला हादरवून देणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील देशभरातून होत आहे.

या दरम्यान, शुक्रवारी साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला १५ दिवसांत आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले. खरं तर, जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला जेव्हा कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याने संमती दिली होती. दरम्यान, आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करु नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आफताब अमीन पूनावाला याच्यावर कोणत्याही थर्ड डिग्री उपायांचा वापर न करण्याचे दिल्ली न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.

भीषण अपघातात स्विफ्टचा चक्काचूर; ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
दरम्यान, श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने बाहेरून एक करवत आणि बाथरुममध्ये श्रद्धाचा मृतदेह कापायला सुरुवात केली. काही वेळाने तो थकला तेव्हा त्याने बाहेरून जेवण मागवले. त्याने मृतदेहासमोर बसून जेवन केले. यादरम्यान त्याने बिअरही प्यायली आणि त्यानंतर त्याने वेब सीरीज पाहिली असा खुलासा केला. गुरुवारी साकेत न्यायालयाने आफताबच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती.

राणीच्या बागेतही रांगा टाळा! १६०व्या वर्षसांगतेनिमित्त आजपासून ऑनलाइन तिकीट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here