मुंबई: देशातील चलनवाढ धीम्या गतीने का होईनस परंतु कमी होत चालल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षअखेर ७ टक्के जीडीपी गाठता येईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्था जागतिक घडामोडींबाबत संवेदनशील असल्याचेही रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. आपली ही निरीक्षणे बँकेने स्वतंत्र लेखामध्ये व्यक्त केली आहेत. हा लेख रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने तयार केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी; जगात तिसऱ्या स्थानाकडे वाटचाल, मॉर्गन स्टॅन्लेचा अंदाज
रिझर्व्ह बँक म्हणते …

– जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे मळभ दाटून आले आहे

– जागतिक स्तरावर बाजारातील स्थिती निराशाजनक आहे, यामुळे बाजारातील भांडवल घटत असून त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता आहे

– पतधोरणात किंचित दरवाढ होईल, असा बाजाराचा अंदाज आहे

– पुरवठा सुधारत असल्यामुळे वस्तू तसेच सेवांना मागणीही वाढून लागली आहे

– शहरी भागातून मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, तर ग्रामीण भागातून अजून तेवढ्या प्रमाणात मागणी वाढलेली दिसत नाही

पुढील १२ महिन्यांत भारतात मंदी येऊ शकते; सीईओंनी व्यक्त केली भीती
भारत प्रगतीपथावर

– चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपी ६.१ टक्के ते ६.३ टक्के यामध्ये राहिल

– भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे

– जीडीपीची वाढ समाधानकारक गतीने होत आहे

बाजाराचा ‘बुल’ घोड्या पेक्षा वेगाने धावणार! शेअर बाजाराबाबत महत्वाचं भाकीत!
– अर्थव्यवस्था कोणत्याही कठीण परिस्थितीशी सामना करू शकते अतकी लवचिकता सध्या अर्थव्यवस्था दर्शवत आहे

आर्थिक वातावरण

– चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी चालू महिनाअखेर जाहीर होईल

– यावर्षी खरीप हंगामातील तांदूळ खरेदी ही मागील वर्षापेक्षा अधिक झाली आहे

– गव्हाची खरेदी यंदाच्या खरीप हंगामात मात्र मोठ्या प्रमाणावर घटली आहे

– त्याचवेळी रब्बी हंगामात पेरणीखालील क्षेत्रात वाढ दिसून येत आहे

– यंदा ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे

– बाजारात खेळत्या पैशामध्ये वाढ होत आहे

– रिझर्व्ह बँकेकडे बाजारातून दररोज सरासरी १.५ लाख कोटी रुपये येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here