मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. आता ‘इंडियन बँके’च्या (Indian Bank) डिपॉझिट स्लिपचा (Deposit Slip) एक फोटो सध्या तुफान शेअर केला जात आहे. खरंतर, बँकेच्या या डिपॉझिट स्लिपमध्ये खातेदाराने रोख ठेव करण्यासाठी आपली सर्व माहिती लिहिली आहे. पण डिपॉझिट स्लिपमधील Deposit Slip रकमेच्या कॉलममधील रकमेऐवजी त्याने जे लिहिले ते वाचून लोकांना हसू आवरता येत नाही.

या डिपॉझिट स्लिपच्या वरच्या बाजूला लिहिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंडियन बँकेच्या मुरादाबाद शाखेशी संबंधित आहे. एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेली होती. मात्र, डिपॉझिट स्लिपमध्ये सर्व माहिती बरोबर लिहिल्यानंतर रकमेच्या कॉलममध्ये रकमेऐवजी ‘तुला’ असं लिहिलं आहे. जिथे हिंदीत राशी असं लिहिलं होतं. त्यापुढे या व्यक्तीने आपली राशी तुळ अशी लिहली आहे. या स्लिपवर बँकेच्या शिक्क्यासोबत १२ एप्रिल ही तारीखही आहे, त्यामुळे ही चूक असूनही बँकर्सनी खातेदारांचे पैसे जमा केल्याचे स्पष्ट होते.

आता करोडपती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण! फक्त आवर्जून करा ‘या’ गोष्टी…
हा फोटो ट्विटर युजर @NationFirst78 ने १६ एप्रिल रोजी शेअर केला होता. पण हा फोटो आता पुन्हा एकदा ऑनलाइन व्हायरल होत आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- लोक किती तेजस्वी आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिले की हे लोक येतात कुठून? काहींनी लिहलं की, तूळ राशीचे लोक असे पराक्रम करत राहतात?

Investment Tips: आताच लावा पैशांचं ‘झाड’ तरच भविष्यात हातात खेळतील नोटा, या टिप्सवर नक्की विचार करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here