न्यायालयात ३ महिन्यांच्या खटल्यानंतर त्यांना जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आणि त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल खोटे बोलल्यासाठी दोषी ठरवले.
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला
एलिझाबेथ होम्सने वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी थेरॅनॉस कंपनी सुरू केली आणि फार कमी कालावधीत जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला बनली. मात्र, त्यानंतर होम्स गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या वादात अडकली. या कारणास्तव त्यांनी २०१८ मध्ये थेरनोस कंपनी पूर्णपणे बंद करण्यात आली.
एलिझाबेथ होम्स कोर्टात रडू लागली
शिक्षा सुनावल्यानंतर एलिझाबेथ होम्सने कोर्टरूममध्येच तिचे आई-वडील आणि जोडीदाराला मिठी मारली. कोर्टात ती रडली आणि म्हणाली की जर तिला संधी मिळाली असती तर तिने अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या. लोकं ज्या गोष्टींतून गेले त्याबद्दल मला लाज वाटते. मी अनेकांना निराश केले आहे.
रुग्णांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता
एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, होम्सला ११ पैकी ४ गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले. कोर्टात, ज्युरीने आपला निर्णय देताना सांगितले की, होम्सने गुंतवणूकदारांकडून पैसे मिळवण्यासाठी कंपनीबद्दल खोटे बोलले. याशिवाय रूग्णांची फसवणूक केल्याच्या ४ खटल्यांत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी एलिझाबेथ होम्सने सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन न्यायाधिशांनी तिची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. तसेच कोर्टात दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते.
शिक्षेनंतरही होम्सला तीन वर्षे पोलिसांच्या देखरेखीखाली राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वीच एलिझाबेथ होम्स रडत माफी मागू लागली. माफी मागण्यासाठी त्यांनी कवी रुमी यांच्या कवितेतील काही ओळीही वाचल्या. त्यांनी म्हटले की “काल मी हुशार होते, त्यामुळे मला जग बदलायचे होते. आज मी समजूतदार आहे, म्हणून मी स्वतःला बदलत आहे.”