Buldana News : एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली.

अपघात नेमका कसा झाला?
खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेमध्ये शेगाव खामगाव रोडवर गाडी चालवत होता. यावेळी पोलिसाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ३ वाहनांना धडक दिली. नंतर अपघातग्रस्त वाहन एका झाडावर जाऊन आदळलं. गाडीचा चालक नशेत असल्याने सदरची घटना घडली. ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या जातात. याबाबत मोठी जनजागृतीही केली जाते. मात्र, पोलीस प्रशासनाकडूनचं असे अपघात घडत असतील तर सर्वसामान्यांना वर काही वचक राहील का? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.